Nashirabad Nagaradhyaksh Pankaj Mahajan : जळगावच्या नशिराबाद नगरपरिषदेच्या प्रभारी नगराध्यक्षपदी पंकज महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी वैयक्तिक कारणास्तव ७५ दिवसांची रजा घेतल्याने नगराध्यक्षपद रिक्त झाले होते. या रिक्त पदावर पंकज महाजन यांनी प्रभारी नगराध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला.
पंकज महाजन यांनी स्वीकारला नशिराबाद नगरपरिषदेचा पदभार ( Nashirabad Nagaradhyaksh Pankaj Mahajan )
पंकज महाजन यांनी कुटुंबीयांसह नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी, शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या सरिता कोल्हे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाजन यांच्या पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रमावेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर महायुतीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या उत्साहपूर्ण वातावरणात पंकज महाजन यांनी नशिराबाद नगरपरिषदेच्या प्रभारी नगराध्यक्षपदाची अधिकृतपणे सूत्रे स्वीकारली.
आगामी काळात नशिराबाद शहरातील मूलभूत सुविधा याकडे अधिक वर असल्याचे देखील पंकज महाजन यांनी पदभार घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे.
हेही वाचा : MPSC पेपरफुटीप्रकरणी जळगांवात विद्यार्थ्यांचा जनआक्रोश मोर्चा; अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी








