MPSC Paper Leak Jalgaon : MPSC परीक्षेतील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. राज्यातील लाखो विद्यार्थी प्रामाणिकपणे स्पर्धा परीक्षांची तयारी करत असून, अशा घटनांमुळे त्यांच्या MPSC प्रक्रियेवरील विश्वासाला धक्का बसत असल्याची भावना निवेदनातून व्यक्त करण्यात आली.
MPSC पेपरफुटीप्रकरणी विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा ( MPSC Paper Leak Jalgaon )
औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटीप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तसेच अन्न व औषध प्रशासन विभागातील पेपरफुटी ही एकमेव घटना नसून, आयोगाच्या इतर परीक्षांमध्येही गैरप्रकार होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. वर्षानुवर्षे अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य आयोगाच्या निष्क्रिय कार्यपद्धतीमुळे धोक्यात येत असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.
विद्यार्थ्यांनी MPSC अध्यक्षांचा राजीनामा घेऊन उच्चस्तरीय चौकशी करावी, मुंबई क्राईम ब्रँचकडून आयोगाला सुमोटो प्रकरणात केलेल्या प्राथमिक चौकशीचा अहवाल सार्वजनिक करावा, तसेच आरोपी अवर सचिव अभिजित लोंढे यांच्या कार्यकाळातील सर्व MPSC परीक्षांचे स्वतंत्र फॉरेन्सिक ऑडिट करावे, अशा मागण्या केल्या आहेत.
हेही वाचा : विसरवाडीत संत सेना महाराज जयंती उत्साहात; पूजन, महाआरती अन् भव्य शोभायात्रेने भक्तिमय वातावरण



