LS खानदेश

आपला आवाज, आपलं खानदेश
  • Home
  • ताज्या बातम्या
  • Jalgaon Accident: जळगावमध्ये भीषण अपघात! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू
गुन्हे

Jalgaon Accident: जळगावमध्ये भीषण अपघात! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

Jalgaon Accident News
1

जितेंद्र कोतवाल | जळगाव प्रतिनिधी 

Jalgaon Accident News : जळगाव जिल्ह्यातून काळीज पिळवटून टाकणारी आणि मन सुन्न करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. जामनेर ते बोदवड रस्त्यावरील मालदाभाडी गावाजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या अपघातातील मृतांमध्ये अवघ्या तीन महिन्यांच्या चिमुकल्यासह दोन लहान मुले, दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश असल्याची माहिती आहे. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले आणि संपूर्ण कुटुंबावर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : Khandesh Tourism : खानदेशातील ६ प्रसिद्ध पर्यटनस्थळे; निसर्ग, मंदिरे आणि ऐतिहासिक किल्ल्यांची सफर

मृतांची ओळख आणि अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट नाही ( Jalgaon Accident News )

या भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी जामनेर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. मात्र, मृतांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. दरम्यान, हा भीषण अपघात नेमका कशामुळे झाला? ट्रकचा वेग किती होता? दुचाकीवर सहा जण प्रवास करत होते का? या प्रश्नांची उत्तरे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास केला जाण्याची अपेक्षा आहे.

भरधाव वाहनांचा वेग, रस्त्यावरील निष्काळजीपणा आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन यांमुळे अशा दुर्घटनांचा धोका वाढतो. मालदाभाडी परिसरातील या भीषण अपघाताने संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला असून, एका कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखद प्रसंगामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.

img

Harshad Kamble

Website Developer | SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics. Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur. I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. 🏆Awarded By :🥇 The Best Digital Marketer And Technologist Award.🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post