LS खानदेश

आपला आवाज, आपलं खानदेश
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जामनेरमध्ये मका काढण्याच्या मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू; तीन मुलांचे पितृछत्र हरपले
गुन्हे

जामनेरमध्ये मका काढण्याच्या मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू; तीन मुलांचे पितृछत्र हरपले

Jamner Farmer Death

जितेंद्र कोतवाल | जळगाव प्रतिनिधी

Jamner Farmer Death: जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात शेतीकाम करताना घडलेल्या दुर्दैवी अपघातात ३७ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. मका काढण्याच्या मशीनमध्ये अडकल्याने योगेश भावालाल पाटील यांचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास भागदरा शिवारात ही घटना घडली. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शेतात काम सुरू असताना काळाचा घाला (Jamner Farmer Death)

मिळालेल्या माहितीनुसार, भागदरा शिवारातील शेतकरी दिनेश महाजन यांच्या शेतात मका काढण्याचे काम सुरू होते. यावेळी योगेश पाटील हे मका काढण्याचे मशीन चालवून शेतीकाम करत होते. काम सुरू असतानाच ते मशीनमध्ये अडकले आणि या दुर्घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हेही वाचा : जळगावमध्ये भरधाव डंपरचा थरार! स्विफ्ट कारला १५ फूट फरपटत नेलं; चालकावर गुन्हा

शेतीकामातून चालवत होते कुटुंबाचा उदरनिर्वाह

योगेश पाटील हे शेतीकामासोबतच मका काढण्याचे मशीन चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले असून, त्यांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले आहे.

या घटनेमुळे भागदरा परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

जामनेर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद (Jamner News)

या घटनेप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अपघाताबाबत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

img

Harshad Kamble

Website Developer | SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics. Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur. I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. 🏆Awarded By :🥇 The Best Digital Marketer And Technologist Award.🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post