Marimata Baragadi Jalgaon : जळगाव शहरातील दीडशे वर्षांची परंपरा लाभलेल्या मरीमातेच्या बारागाड्यांचा पारंपरिक सोहळा आज भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. टॉवर चौकापासून भिलपुरा पोलीस चौकीजवळील मरीमाता मंदिरापर्यंत बारागाड्या ओढण्यात आल्या.
जळगावात मरीमातेच्या बारागाड्यांचा पारंपरिक सोहळा ( Marimata Baragadi Jalgaon )
कार्यक्रमाच्या प्रारंभी पोलीस पाटील प्रभाकर पाटील यांच्या हस्ते बारागाड्यांचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर राहुल भगत यांनी बारागाड्या ओढून या पारंपरिक सोहळ्याला सुरुवात केली. यापूर्वी शहरातील विविध मरीमाता मंदिरांचे दर्शन घेत बारागाड्यांना फेरी मारण्यात आली.
या धार्मिक सोहळ्याला महिला, पुरुष आणि लहान मुलांसह भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या या सोहळ्याचा भक्तांनी मोठ्या उत्साहात अनुभव घेतला. परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, मोठ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच वाहतूक आणि गर्दीचे नियोजन सुरळीत राहावे यासाठी शहर पोलीस ठाणे आणि शनिपेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
हेही वाचा : MPSC पेपरफुटीप्रकरणी जळगांवात विद्यार्थ्यांचा जनआक्रोश मोर्चा; अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी








