LS खानदेश

आपला आवाज, आपलं खानदेश
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगावात दसऱ्याच्या रात्री हत्या! चॉपर हल्ल्यात ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
गुन्हे

जळगावात दसऱ्याच्या रात्री हत्या! चॉपर हल्ल्यात ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Jalgaon Murder Case

जितेंद्र कोतवाल | जळगाव प्रतिनिधी

Jalgaon Murder Case: जळगाव शहरातील माउली नगर परिसरात दसऱ्याच्या रात्री रक्तरंजित थरार घडला. गरबा-दांडिया सुरू असताना झालेल्या वादातून ४० वर्षीय किरण विठ्ठल पाटील यांची चॉपरने वार करून हत्या करण्यात आली. या हल्ल्यात किशोर छगन पाटील हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

जळगावच्या माउली नगरात नेमकं काय घडलं? (Jalgaon Murder Case)

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, माउली नगर परिसरात दुर्गा मंडळाच्या वतीने गरबा आणि दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री उशिरा दांडिया सुरू असताना दुचाकीवरून आलेल्या तीन तरुणांनी महिलांच्या दिशेने दुचाकीचा हेडलाइट चमकवला. यावरून विचारणा करण्यात आल्यानंतर संबंधित तरुण आणि उपस्थितांमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद पुढे वाढत गेल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, किरण पाटील (Kiran Vitthal Patil) आणि किशोर पाटील यांनी वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिस्थिती चिघळली आणि एका संशयिताने चॉपर काढून किरण पाटील यांच्या छातीवर वार केल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या किरण पाटील यांचा मृत्यू झाला, तर किशोर पाटील हे जखमी झाले.

हेही वाचा : जामनेरमध्ये मका काढण्याच्या मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू

संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना

या प्रकरणात मयूर जाधव, रोहित पाटील आणि अन्य एका तरुणाचा सहभाग असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर संशयित पसार झाले असून, त्यांचा शोध घेण्यासाठी जळगाव एमआयडीसी पोलिसांनी तीन पथके रवाना केली आहेत.

दरम्यान, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या हत्येमागील नेमके कारण, वादाचे स्वरूप आणि संशयितांचा सहभाग याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. संशयितांना अटक झाल्यानंतरच या प्रकरणातील अधिक तपशील स्पष्ट होणार आहेत.

img

Harshad Kamble

Website Developer | SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics. Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur. I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. 🏆Awarded By :🥇 The Best Digital Marketer And Technologist Award.🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post