जितेंद्र कोतवाल | जळगाव प्रतिनिधी
Jalgaon Bail Pola 2026 : जळगाव जिल्ह्यातील जैन हिल्स येथे सार्वजनिक बैलपोळा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला शेतकरी बांधवांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पारंपरिक कला, लेझीम आणि आदिवासी नृत्याच्या सादरीकरणामुळे जैन हिल्स परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
जैन हिल्सवर बैलपोळ्याच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रम ( Jalgaon Bail Pola 2026 )
बैलपोळा उत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात झाली. जळगाव जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या शेतकरी बांधवांनी कार्यक्रमाला मोठी उपस्थिती लावली. पारंपरिक सणाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे बैलपोळ्याच्या उत्सवाला वेगळाच रंग आला.
कार्यक्रमात विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी पारंपरिक लेझीमचे सादरीकरण केले. तालबद्ध हालचाली आणि आकर्षक प्रात्यक्षिकांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमस्थळी उत्साह आणखी वाढला.
हेही वाचा : जळगावात दीडशे वर्षांची परंपरा; भक्तिमय वातावरणात बारागाड्यांचा सोहळा
आदिवासी नृत्याने वेधले उपस्थितांचे लक्ष
यानंतर आदिवासी बांधवांनी पारंपरिक आदिवासी नृत्य सादर केले. पारंपरिक वेशभूषा, लोककला आणि नृत्याच्या ठेक्यामुळे उपस्थितांचे लक्ष वेधले गेले. या सादरीकरणातून आदिवासी समाजाच्या समृद्ध लोकपरंपरेचे दर्शन उपस्थितांना घडले.
जळगाव जिल्ह्यातील विविध भागांतून अनेक शेतकरी बांधव जैन हिल्स येथे दाखल झाले होते. बैलपोळ्याच्या पारंपरिक उत्सवाचा आनंद घेण्यासाठी नागरिकांमध्येही उत्साह दिसून आला.
बैलपोळा, लोककला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या संगमामुळे जैन हिल्सवरील कार्यक्रमाला विशेष रंगत आली.


