LS खानदेश

आपला आवाज, आपलं खानदेश
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगावात गणेश विसर्जनासाठी महापालिका सज्ज; मेहरूण तलावावर १०० हून अधिक कर्मचारी तैनात
जळगाव

जळगावात गणेश विसर्जनासाठी महापालिका सज्ज; मेहरूण तलावावर १०० हून अधिक कर्मचारी तैनात

Jalgaon Ganesh Visarjan 2026
11

जितेंद्र कोतवाल | जळगाव प्रतिनिधी 

Jalgaon Ganesh Visarjan 2026 : जळगावात गणरायाच्या विसर्जनासाठी महापालिका प्रशासन सज्ज झालं आहे. मेहरूण तलावावरील गणेश घाटासह शहरातील विविध विसर्जनस्थळांवर आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त आदित्य जीवने यांनी स्वतः पाहणी करत व्यवस्थेचा आढावा घेतला.

मेहरूण गणेश घाटावर १०० हून अधिक कर्मचारी तैनात ( Jalgaon Ganesh Visarjan 2026 )

मेहरूण तलावावर भाविकांच्या सुरक्षेसाठी तब्बल शंभरहून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच तराफे आणि बोटीही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.

यंदाच्या व्यवस्थेतील आणखी एक विशेष बाब म्हणजे स्वच्छता कर्मचाऱ्यांना पहिल्यांदाच गणवेश देण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केलं आहे. निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करणारे फलकही लावण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा विसर्जनासाठी महापालिकेचं चोख आणि नियोजनबद्ध व्यवस्थापन पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : मोदक खायचाय… पण २७ हजार रुपये किलो! सोन्याचा वर्क असलेल्या मोदकाने वेधले लक्ष

img

Harshad Kamble

Website Developer | SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics. Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur. I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. 🏆Awarded By :🥇 The Best Digital Marketer And Technologist Award.🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post