LS खानदेश

आपला आवाज, आपलं खानदेश
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव मनपाच्या मानाच्या गणपतीची भव्य मिरवणूक; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचा जयघोष
जळगाव

जळगाव मनपाच्या मानाच्या गणपतीची भव्य मिरवणूक; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचा जयघोष

Jalgaon Ganpati 2026
12

जितेंद्र कोतवाल | जळगाव प्रतिनिधी 

Jalgaon Ganpati 2026 : जळगाव शहरातील मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महानगरपालिकेच्या गणपतीची आज भव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते बाप्पाचे विधिवत पूजन करण्यात आल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

जळगाव मनपाच्या मानाच्या गणपतीची मिरवणूक उत्साहात ( Jalgaon Ganpati 2026 )

जळगाव महानगरपालिकेचा गणपती हा शहरातील मानाचा गणपती मानला जातो. त्यामुळे या गणपतीच्या मिरवणुकीला गणेशोत्सवात विशेष महत्त्व आहे. मनपाच्या गणपतीची मिरवणूक पार पडल्यानंतरच शहरातील इतर गणेश मंडळांच्या मिरवणुकीला सुरुवात होते, अशी परंपरा जळगाव शहरात पाहायला मिळते.

मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग घेतला. अनेक नागरिक पारंपरिक वेशभूषेत मिरवणुकीत सहभागी झाले होते. ढोल-ताशांचा निनाद, बाप्पाच्या जयघोषासह नागरिकांचा उत्साह यामुळे शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते.

हेही वाचा : प्रतिष्ठापनेपूर्वीच बाप्पाला निरोप! जळगावात खंडित गणेशमूर्तीचे भावपूर्ण विसर्जन; भक्तांच्या डोळ्यात अश्रू

मिरवणुकीत नागरिकांची मोठी गर्दी

मिरवणुकीच्या मार्गावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक वाद्यांचा गजर आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषणांनी मिरवणुकीला विशेष रंगत आली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही मनपाच्या मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीनंतर शहरातील विविध गणेश मंडळांकडून मिरवणुका काढण्यात येणार आहेत. त्यामुळे जळगाव शहरात गणेशोत्सवाचा उत्साह आणखी वाढला असून, पुढील काही दिवस शहरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळणार आहे.

img

Harshad Kamble

Website Developer | SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics. Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur. I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. 🏆Awarded By :🥇 The Best Digital Marketer And Technologist Award.🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post