LS खानदेश

आपला आवाज, आपलं खानदेश
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव गणपती विसर्जनासाठी प्रशासन सज्ज; मेहरूण तलावासह विसर्जन मार्गाची जय्यत तयारी
जळगाव

जळगाव गणपती विसर्जनासाठी प्रशासन सज्ज; मेहरूण तलावासह विसर्जन मार्गाची जय्यत तयारी

Jalgaon Ganpati Visarjan 2026
0

Jalgaon Ganpati Visarjan 2026 : जळगाव शहरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच आता प्रशासनासमोर आहे गणेश विसर्जनाचे आव्हान… विसर्जन मिरवणुका शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडाव्यात, यासाठी जळगाव महानगरपालिका, पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक घेत आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

तर दुसरीकडे विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला देखील वेग देण्यात आला आहे. मात्र, नुकतेच बुजवण्यात आलेले काही खड्डे पुन्हा उखडल्याने महापौर दीपमाला काळे यांनी संबंधित ठेकेदाराला चांगलेच सुनावले.  गणेश विसर्जनाला आता अवघे काही दिवस शिल्लक असल्याने जळगाव शहरातील प्रशासन कामाला लागले आहे. गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने विशेष बैठक घेण्यात आली. विसर्जन मिरवणूक कोणत्या मार्गाने आणि कोणत्या क्रमांकानुसार निघणार, याबाबत मंडळांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. मिरवणुकीदरम्यान शिस्त आणि कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यावर प्रशासनाचा विशेष भर आहे.

मेहरूण तलावावर जय्यत तयारी ( Jalgaon Ganpati Visarjan 2026 )

गणेश मूर्ती विसर्जनासाठी मेहरूण तलाव येथील गणेश घाटावरही विशेष तयारी करण्यात आली आहे. भाविकांची सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने मदत मिळावी, यासाठी आवश्यक साहित्य आणि यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने मॉक ड्रिल घेऊन आपत्कालीन परिस्थितीचा सरावही करण्यात आला आहे. यामुळे विसर्जनाच्या दिवशी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.

हेही वाचा : महाराष्ट्रात दुष्काळाचं सावट! पावसाअभावी पिके संकटात; फडणवीसांचे मोठे निर्देश

विसर्जन मार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न

एकीकडे विसर्जनासाठी प्रशासनाची तयारी सुरू असताना दुसरीकडे शहरातील रस्त्यांची स्थिती हा देखील महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील खड्डे तातडीने बुजविण्याच्या सूचना महानगरपालिका प्रशासनाने दिल्या आहेत. आयुक्त आदित्य जीवने आणि महापौर दीपमाला काळे यांनी मिरवणूक मार्गाची पाहणी करत रस्त्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतला.

मात्र, काही ठिकाणी पहिल्याच पावसात रस्त्यांची अवस्था खराब झाल्याचे पाहायला मिळाले. यावरून महापौर दीपमाला काळे यांनी संबंधित ठेकेदारावर नाराजी व्यक्त केली.

महापौरांचा ठेकेदाराला इशारा

मोठे खड्डे बुजवण्यात आले असले तरी काही ठिकाणी लहान खड्डे अद्यापही कायम असल्याचे महापौरांच्या पाहणीत निदर्शनास आले. खड्डा मोठा असो किंवा लहान, तो वाहनचालकांसाठी आणि मिरवणुकीसाठी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे मिरवणूक मार्गावरील एकही खड्डा शिल्लक राहू नये, अशा स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

मंडळांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन ( Jalgaon Ganpati Visarjan )

दरम्यान, गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना विसर्जन मिरवणुकीबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या. पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाने निश्चित केलेल्या क्रमांकानुसारच मिरवणुका निघतील, याची स्पष्ट सूचना मंडळांना देण्यात आली आहे. मिरवणुकीदरम्यान कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये आणि गणेश विसर्जनाचा उत्सव शांततेत पार पडावा, यासाठी मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

एकीकडे भक्तीचा उत्साह… दुसरीकडे प्रशासनाची कसोटी… गणेश विसर्जन शांततेत, शिस्तीत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी जळगाव प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. आता विसर्जनाच्या दिवशी प्रशासनाच्या या तयारीला गणेश मंडळे आणि नागरिकांचे किती सहकार्य मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

img

Harshad Kamble

Website Developer | SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics. Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur. I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. 🏆Awarded By :🥇 The Best Digital Marketer And Technologist Award.🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post