LS खानदेश

आपला आवाज, आपलं खानदेश
राजकारण

जळगावात 15 गुणवंत शिक्षकांचा जिल्हा शिक्षक पुरस्काराने गौरव

Jalgaon District Teacher Award 2026
16

Jalgaon District Teacher Award 2026 : शिक्षक दिनाच्या निमित्ताने जळगावात जिल्हा शिक्षक पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासक्रमाचे ज्ञान न देता त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणारे ‘जीवनाचे दीपस्तंभ’ बनावे, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिक्षकांना केले.

भैयासाहेब गंधे हॉल, ला. ना. हायस्कूल येथे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित या सोहळ्यात जिल्ह्यातील उल्लेखनीय शैक्षणिक कार्य करणाऱ्या १५ शिक्षकांचा जिल्हा शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

हेही वाचा : नीम करोली बाबा कोण होते ? पहा Hanuman Ansh’ Movie ची पूर्ण कहाणी

विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करण्याची शिक्षकांची भूमिका ( Jalgaon District Teacher Award 2026 )

पालकमंत्री पाटील यांनी तंत्रज्ञानामुळे माहिती सहज उपलब्ध होत असली, तरी विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, माणुसकी आणि प्रेरणा निर्माण करण्याची ताकद शिक्षकांमध्येच असल्याचे सांगितले. शाळांची पटसंख्या, विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे हेच शाळेचे खरे वैभव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पुरस्कारप्राप्त शिक्षकांची बंद असलेली आगाऊ वेतनवाढ पुन्हा सुरू करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे संवाद कमी होत असल्याने शिक्षकांची जबाबदारी वाढल्याचे सांगितले. तर आमदार अनिल पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात एआयमुळे नवी क्रांती होत असल्याचे नमूद केले. आमदार राजूमामा भोळे यांनी ‘शिक्षक ही नोकरी नसून जबाबदारी आहे’, असे सांगत पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले.

img

Harshad Kamble

Website Developer | SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics. Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur. I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. 🏆Awarded By :🥇 The Best Digital Marketer And Technologist Award.🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post