Sanjay Jadhav : बैठकीदरम्यान खासदार संजय जाधव काजू-बदाम खात असल्याचा VIDEO समोर आल्यानंतर माध्यमांनी त्यांना याबाबत सवाल केला. यावर जाधवांनी माध्यमांवरच नाराजी व्यक्त केली. “काजू-बदाम ज्यांनी ठेवले, त्यांनाच विचारा की का ठेवले. आणि तुम्ही काय तुमच्या घरी काजू-बदाम खात नाही का?” असा थेट सवाल त्यांनी केला. भूक लागली म्हणून काजू-बदाम खाल्ले, यात गैर काय? असा सवाल करत माध्यमांनी मुद्दाम हा विषय ताणून धरल्याचंही जाधव म्हणाले. काजू-बदाम ठेवले नसते आणि दुसरं काही खायला ठेवलं असतं, तरी तुम्ही असंच बोलला असतात का? असा प्रतिप्रश्नही त्यांनी माध्यमांना केला.
नांदेडच्या दुष्काळ आढावा बैठकीत नेमकं काय घडलं? ( Sanjay Jadhav )
दरम्यान, पावसाअभावी शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं असताना त्यावर चर्चा करण्यासाठी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत काजू-बदाम खाण्याचा VIDEO समोर आल्याने आता या बैठकीच्या गांभीर्यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान, पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर असताना लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकारी या परिस्थितीकडे किती गांभीर्याने पाहत आहेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र, या बैठकीतील नेमकी चर्चा आणि निर्णय काय झाले, याकडेही शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
“आमच्या गुरांसाठी चारा नाही, पाणी नाही… शेती सुकून गेली आहे, आता आम्ही फक्त सरकारच्या भरवशावर आहोत,” अशी व्यथा शेतकरी मांडत आहेत. एकीकडे शेतकरी पाऊस आणि मदतीच्या प्रतीक्षेत असताना, दुसरीकडे त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी घेतलेल्या बैठकीत काजू-बदाम खाण्याचा VIDEO समोर येतोय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संकटाचं गांभीर्य समजून घेण्याऐवजी सरकार आणि लोकप्रतिनिधी काजू-बदाम खाण्यातच व्यस्त आहेत का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा : लालबागच्या राजाच्या दर्शनाच्या रांगेत २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू; जयदीप नेमाडेंना नेमकं काय झालं?
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बैठकीत चर्चा ( Marathwada Drought )
दरम्यान, या संपूर्ण प्रकारावर शेतकऱ्यांकडूनही संताप व्यक्त केला जात आहे. “फक्त मागण्या मान्य करू, अशी आश्वासनं आता नकोत; आमच्या मागण्या प्रत्यक्ष मान्य करा आणि आम्हाला मदत करा,” अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांच्या समोर दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न ऐरणीवर आला असताना, आढावा बैठकीत लोकप्रतिनिधी काजू-बदाम कसे काय खाऊ शकतात? असा सवालही शेतकरी उपस्थित करत आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी घेतलेल्या बैठकीतच असा प्रकार घडत असेल, तर या संकटाची लोकप्रतिनिधींना आणि प्रशासनाला किती जाणीव आहे, असा प्रश्न आता शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
शेतकऱ्यांच्या डोक्यावर पावसाअभावी संकटाचं सावट असताना, त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न ऐरणीवर असताना, त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी घेतलेल्या आढावा बैठकीत काजू-बदाम खाणं कितपत योग्य आहे? शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही पुढे येता, मग त्याच शेतकऱ्यांच्या व्यथा समोर असताना असं वागणं योग्य आहे का? आश्वासनांची माळ नको, प्रत्यक्ष मदत हवी असं शेतकरी सांगत असताना त्यांच्या प्रश्नांचं गांभीर्य कधी समजणार? आता काजू-बदामाच्या VIDEO पेक्षा शेतकऱ्यांच्या पिकांचा आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवण्यासाठी नेमकी काय पावलं उचलली जाणार, याचं उत्तर शेतकरी मागत आहेत…







