LS खानदेश

आपला आवाज, आपलं खानदेश
  • Home
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्रातील 255 तालुक्यांत दुष्काळ! विखे पाटलांचं मोठं आवाहन; ‘लग्न साधं करा, पाणी जपून वापरा’
जळगाव

महाराष्ट्रातील 255 तालुक्यांत दुष्काळ! विखे पाटलांचं मोठं आवाहन; ‘लग्न साधं करा, पाणी जपून वापरा’

Maharashtra Drought 2026
8

जितेंद्र कोतवाल | जळगाव प्रतिनिधी 

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २५५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दोन निकषांच्या आधारे हा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण मर्यादेपेक्षा कमी राहणे आणि पावसाचा दीर्घ खंड पडणे, या कारणांमुळे संबंधित तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत.

रब्बी हंगामात धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याच्या आधारे चारा उत्पादनाचे नियोजन करता येईल का, याबाबत पुढील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहे. या बैठकीत जिल्ह्यातील पाणीटंचाई, अन्नधान्याचा साठा, चाऱ्याची उपलब्धता आणि एकूण परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल.

दुष्काळाच्या काळात पाणी जपून वापरण्याचे आवाहन ( Maharashtra Drought 2026 )

आज जळगाव जिल्ह्यात पाणी मुबलक असले, तरी भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याची पातळीही खालावत आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी जपून वापरणे गरजेचे आहे. मंत्री म्हणून नागरिकांमध्ये जनजागृती करणे ही माझी जबाबदारी आहे. गावागावात लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांच्या आवाहनाला नागरिक प्रतिसाद देतात. त्यामुळे नागरिकांनी सरकारला सहकार्य करावे, ही विनंती आहे.

सध्या जळगाव जिल्ह्यात पाण्याची परिस्थिती चांगली आहे. मराठवाडा आणि इतर काही भागांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती आहे. जळगाव जिल्ह्यातील धरणांची स्थिती इतर जिल्ह्यांच्या तुलनेत चांगली आहे.

हेही वाचा : विसर्जनाच्या काही तास आधी 50 ढोल फोडले! शिवगंध पथकाला मोठा धक्का; जळगावात नेमकं काय घडलं?

दुष्काळाच्या परिस्थितीत साध्या पद्धतीने लग्न करा – Radhakrishna Vikhe Patil

आम्ही सर्वांना साध्या पद्धतीने लग्न करण्याचे आवाहन करत आहोत. एखाद्याने, ‘माझ्या मुलीचे लग्न आहे, मला माझ्या पद्धतीने लग्न करायचे आहे,’ असे म्हटले तर त्याला कोण रोखू शकत नाही. मात्र, दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता लग्नसमारंभ साध्या पद्धतीने करावेत, ही आमची विनंती आहे.

जळगाव जिल्ह्यात झालेल्या दूध संघाच्या बैठकीत शेतकऱ्यांना ५० पैशांची दरवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, शेतकऱ्यांनी दूध दरात एक रुपयाची वाढ करण्याची मागणी केली आहे. आता प्रशासन आणि संचालक मंडळ याबाबत निर्णय घेतील. यातून निश्चितच काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न करू. मोर्चा काढणे हा त्यांचा अधिकार आहे आणि त्यांनी तो काढला पाहिजे. शेवटी प्रत्येकाला आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे.

शेतकऱ्यांसाठी वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रश्न

सर्वत्र विजेचा तुटवडा आहे, ही वस्तुस्थिती आहे. शेतकऱ्यांना सात ते आठ तास वीजपुरवठा मिळाला पाहिजे. याबाबत आम्ही बैठक घेतली असून अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. चार दिवसांत यावर तोडगा निघाला नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांनाही टंचाईच्या बैठकीला बोलावण्यात येईल. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. दुष्काळ जाहीर केल्यानंतर त्यांना एवढी माहिती आहे का, की सोयाबीन कुठे लागते?

आता तुमच्यामध्ये कोण आरोपी आहे, हे मला कसे कळणार? या गर्दीमध्ये कोण आरोपी आहे आणि कोण गुन्ह्यातील आरोपी आहे, हे मला कसे माहिती असणार? मला तर हा माझा शेतकरी वाटतो. शेतकऱ्यांच्या गर्दीत कोणी गुंड घुसला असेल, तर त्याची माहिती मला कशी असणार?

img

Harshad Kamble

Website Developer | SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics. Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur. I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. 🏆Awarded By :🥇 The Best Digital Marketer And Technologist Award.🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post