LS खानदेश

आपला आवाज, आपलं खानदेश
जळगाव

मेहरूण तलावात सांडपाणी; गणेश विसर्जनाचा प्रश्न ऐरणीवर

Mehrun Lake
14

Mehrun Lake : जळगाव शहरातील मेहरूण तलाव…पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा तलाव…..सध्या थेट सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याच्या मुद्द्यामुळे चर्चेत…..मेहरूण तलाव वाचवा, पर्यावरण जपा…..घाणेरड्या पाण्यात बाप्पाचे विसर्जन करणार का?” असा संदेश असलेला पोशाख आणि या पोषाखावरील प्रश्नाकडे आता सगळ्यांचं च लक्ष लागलंय….

तलावात सांडपाणी सोडले जात असल्याचा आरोप भाजपच्या नगरसेविका वैशाली पाटील यांनी केलाय. महापालिका प्रशासनासह आपल्याच सत्ताधारी पक्षाला त्यांनी ठोस सवाल विचारलाय…
महासभेत वैशाली पाटील यांनी “मेहरूण तलाव वाचवा, पर्यावरण जपा… घाणेरड्या पाण्यात बाप्पाचे विसर्जन करणार का?”. असा ठोस सवाल त्यांनी आपल्याच सत्ताधारी पक्षाला विचारलाय. यामागचा नेमका विषय काय चला जाणून घेऊयात…

मेहरूण तलावात सांडपाणी; गणेश विसर्जनाचा प्रश्न ऐरणीवर ( Mehrun Lake )

मेहरूण तलावात थेट सांडपाणी सोडले जातय. त्यामुळे तलावातील पाण्याच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तलाव हा केवळ पाणीसाठा नसून शहराच्या पर्यावरणीय व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. सांडपाणी थेट तलावात मिसळत राहिल्यास पाण्याचे प्रदूषण वाढण्याची शक्यता असते. याचा परिणाम तलावातील जलचर, परिसरातील पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर होऊ शकतो.गणेशोत्सवाच्या काळात मेहरूण तलावात गणेशमूर्ती विसर्जन केल्या जातात . त्यामुळे विसर्जनापूर्वी तलावातील पाण्याची स्वच्छता आणि प्रदूषणाचा मुद्दा अधिक महत्त्वाचा ठरतो.

याच मुद्द्यावरून वैशाली पाटील यांनी प्रशासनाला सवाल केला आहे…जर तलावात सांडपाणी सोडले जात असेल, तर त्याच पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन कसे करायचे? म्हणूनच त्यांची मागणी केवळ तलाव स्वच्छ करण्यापुरती मर्यादित नसून, गणेश विसर्जनापूर्वी तलावात येणारे सांडपाणी रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशी पण आहे.

हेही वाचा : धुळ्यात 200 बेडच्या कॅन्सर हॉस्पिटलचे उद्घाटन करणार;

वैशाली पाटील यांनी प्रशासनाला विचारले सवाल ( Jalgaon Lake Pollution )

तलावाची स्वच्छता करणे हा एक भाग झाला; मात्र सांडपाणी तलावात येतच राहिले, तर केवळ वरवरची स्वच्छता करून प्रश्न कायमस्वरूपी सुटणार नाही.,त्यामुळे सांडपाण्याचा स्रोत नेमका कुठे आहे? सांडपाणी तलावापर्यंत कसे पोहोचते?
ते रोखण्यासाठी महापालिकेने कोणती व्यवस्था केली आहे? आणि गणेश विसर्जनापूर्वी कोणती तातडीची उपाययोजना केली जाणार? या प्रश्नांना आता प्रशासनाला सामोरे जावे लागणार आहेत.

या संपूर्ण प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वैशाली पाटील या सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविका आहेत. त्यामुळे त्यांनी महापालिका प्रशासनासोबतच आपल्याच पक्षाच्या सत्ताधाऱ्यांना मेहरूण तलावाच्या प्रश्नावरून जाब विचारला आहे. महासभेत अनोख्या पद्धतीने लक्ष वेधून त्यांनी हा प्रश्न केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा न ठेवता नागरिकांच्या आणि पर्यावरणाच्या प्रश्नाशी जोडला आहे.

या संपूर्ण प्रकारचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जितेंद्र कोतवाल यांनी…..मेहरूण तलावाचा प्रश्न हा केवळ गणेश विसर्जनापुरता मर्यादित नाही. तलावात जाणारे सांडपाणी रोखणे, तलावाचे प्रदूषण थांबवणे आणि शहराच्या पर्यावरणाचे रक्षण करणे, ही प्रशासनासमोरची मोठी जबाबदारी आहे.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता प्रशासन या प्रश्नावर काय ठोस पावले उचलते, सांडपाण्याचा प्रवाह थांबवला जातो का आणि मेहरूण तलाव पुन्हा स्वच्छ होतो का, याकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे. कारण मेहरूण तलाव वाचला, तरच जळगावचे ( Jalgaon ) पर्यावरण वाचेल!

img

Harshad Kamble

Website Developer | SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics. Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur. I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. 🏆Awarded By :🥇 The Best Digital Marketer And Technologist Award.🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post