LS खानदेश

आपला आवाज, आपलं खानदेश
  • Home
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्रात दुष्काळाचं सावट! पावसाअभावी पिके संकटात; फडणवीसांचे मोठे निर्देश
खान्देश

महाराष्ट्रात दुष्काळाचं सावट! पावसाअभावी पिके संकटात; फडणवीसांचे मोठे निर्देश

Maharashtra Drought 2026
2

Maharashtra Drought 2026 : पावसाने दडी मारल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आता दुष्काळाचं सावट गडद होताना दिसतंय! पीक हाता तोंडाशी आली असताना पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. कापूस, सोयाबीन, मका, बाजरी यासह अनेक पिकांवर पावसाअभावी संकट ओढावलंय.

काही ठिकाणी पिकं सुकत आहेत…याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी परिस्थितीचा प्राथमिक आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. १९ सप्टेंबर रोजी नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला जात असल्याचं सांगितलं.

पंचनामे आणि प्राथमिक अहवालाकडे शेतकऱ्यांचे लक्ष ( Maharashtra Drought 2026 )

मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा करून प्रत्येक मंत्र्याला आपल्या जिल्ह्यात प्राथमिक असेसमेंट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
म्हणजेच आता प्रत्येक जिल्ह्यात पावसाची स्थिती, पिकांचं नुकसान आणि शेतकऱ्यांवर झालेला परिणाम याचा प्राथमिक आढावा घेतला जाणार आहे. शेतकरी बांधवांनो, आता या प्राथमिक पाहणीनंतर सरकारकडून शेतकऱ्यांसाठी नेमकी काय मदत जाहीर होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा : ‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत’; आनंद परांजपेंचं वक्तव्य, ‘ऑपरेशन टायगर 3.0’वर सस्पेन्स कायम

img

Harshad Kamble

Website Developer | SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics. Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur. I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. 🏆Awarded By :🥇 The Best Digital Marketer And Technologist Award.🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post