LS खानदेश

आपला आवाज, आपलं खानदेश
जळगाव

जळगावमध्ये गणेशोत्सवात प्रसादाबाबत सावधान! FDA कडून विशेष सूचना

Jalgaon Ganeshotsav Prasad
10

जितेंद्र कोतवाल |जळगाव प्रतिनिधी

Jalgaon Ganeshotsav Prasad : जळगाव शहरात आज मोठ्या उत्साहात गणरायाची स्थापना होत आहे. गणेशोत्सव म्हटलं की भक्ती, उत्साह आणि त्यासोबतच महाप्रसाद आणि अन्नदानालाही विशेष महत्त्व असतं. मात्र, याच काळात भाविकांच्या आरोग्याचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. महाप्रसादाच्या नावाखाली भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ विकले जाऊ नयेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील मिठाई आणि प्रसाद विक्रेत्यांची तपासणीही केली जात आहे. त्यामुळे गणेश मंडळांसह भाविकांनीही प्रसादाबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जळगावमध्ये गणेशोत्सवात प्रसादाबाबत सावधान! ( Jalgaon Ganeshotsav Prasad )

गणरायाच्या आगमनाने जळगाव शहर भक्तिमय झालं आहे. गणपतीची स्थापना झाल्यानंतर अनेक मंडळांकडून महाप्रसाद आणि अन्नदानाचे आयोजन केले जाते. मात्र, प्रसाद तयार करताना स्वच्छता, दर्जेदार साहित्य आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यावर भर देण्यात आला आहे.

बाजारात मोठ्या प्रमाणावर मिठाई आणि पेढ्यांचे मोदक विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अशावेळी परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खाद्यपदार्थ खरेदी करण्याचे आवाहन केले जात आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांचे पालन करूनच प्रसाद तयार केला जात असल्याचे विक्रेत्यांनी स्पष्ट केले आहे. स्वतः घरी तयार केलेले पेढ्यांचे मोदक असून त्यात कोणत्याही प्रकारची भेसळ नसल्याचा दावा त्यांनी केला.

हेही वाचा : जळगावमध्ये ई-बाईकवर विराजमान गणराय; ‘इंधन बचाव, देश बचाव’चा अनोखा संदेश

अन्न व औषध प्रशासनाच्या विशेष सूचना

तर दुसरीकडे भाविकांकडूनही प्रसादाबाबत जागरूकता व्यक्त केली जात आहे. शक्य असल्यास घरच्या घरी प्रसाद तयार करावा आणि बाहेरून खरेदी करताना परवानाधारक विक्रेत्याचीच निवड करावी, असे भाविकांचे म्हणणे आहे.

गणेशोत्सवात शक्यतो घरीच प्रसाद तयार करावा. बाहेरून प्रसाद घेताना तो परवानाधारक विक्रेत्याकडूनच घ्यावा. भेसळयुक्त पदार्थ आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. गणेशोत्सव आणि गौरी-गणपतीच्या काळात भाविकांना प्रसादाचे वाटप मोठ्या प्रमाणावर केले जाते. त्यामुळे प्रसाद तयार करण्यापासून ते वाटप करण्यापर्यंत स्वच्छतेची काळजी घेणे गरजेचे आहे.

परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खाद्यपदार्थ घेण्याला प्राधान्य दिले जाते. शक्य असल्यास प्रसाद घरीच तयार केला जातो आणि वाटप करतानाही चांगल्या दर्जाच्या पदार्थांचा वापर करण्याची काळजी घेतली जाते. एकीकडे गणरायाच्या आगमनाचा उत्साह, तर दुसरीकडे भाविकांच्या आरोग्याची जबाबदारी. त्यामुळे महाप्रसाद असो किंवा मिठाई—भक्तीबरोबरच सुरक्षिततेचीही काळजी घ्या, आणि प्रसाद खरेदी करताना परवानाधारक विक्रेत्याचीच निवड करा.

img

Harshad Kamble

Website Developer | SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics. Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur. I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. 🏆Awarded By :🥇 The Best Digital Marketer And Technologist Award.🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post