Jalgaon Girls Dahi Handi 2026 : जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर उद्या मुली आणि युवतींच्या दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळणार आहे. युवा फाउंडेशन आणि वल्लभलाल जैन अँड कांताई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवतीर्थ मैदानावर मुलींच्या दहीहंडीची जय्यत तयारी ( Jalgaon Girls Dahi Handi 2026 )
या दहीहंडी महोत्सवात जळगाव जिल्ह्यातील तब्बल ११ महिला गोविंदा पथके सहभागी होणार आहेत. डीजे आणि सहवाद्यांच्या तालावर मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडण्याचा थरार यावेळी अनुभवता येणार आहे. महाविद्यालयीन तरुणींसह विविध महिला गोविंदा पथकांमध्ये या कार्यक्रमाबाबत मोठा उत्साह असून, दहीहंडी फोडण्यासाठी पथकांकडून जोरदार सराव आणि तयारी करण्यात आली आहे. महिला गोविंदांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजकांकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा : जळगावात १६ वर्षांची परंपरा कायम! सागर पार्कवर एल. के. फाउंडेशनची भव्य दहीहंडी
महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा विशेष सोहळा
या कार्यक्रमाच्या तयारीची माहिती देण्यासाठी आयोजकांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सीमा पाटील यांनी कार्यक्रमाची रूपरेषा, महिला गोविंदा पथकांचा सहभाग आणि करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली.
महिलांच्या सहभागातून महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा हा दहीहंडी सोहळा यंदाच्या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. शिवतीर्थ मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी परिसरात जय्यत तयारी पूर्ण करण्यात आली आहे.




