Jalgaon Dahi Handi 2026 : जळगावकरांसाठी यंदाची दहीहंडी आणखी खास ठरणार आहे. एल. के. फाउंडेशनच्या वतीने सागर पार्क येथे भव्य मराठमोळ्या दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. गेल्या १६ वर्षांपासून सुरू असलेली दहीहंडीची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली असून, गोविंदा पथकांचा थरार, ढोल-ताशांचा गजर आणि जल्लोषपूर्ण वातावरणाने सागर पार्क परिसर दुमदुमणार आहे.
यंदाच्या दहीहंडी महोत्सवासाठी फाउंडेशनकडून विशेष तयारी करण्यात येत आहे. आकर्षक विद्युत रोषणाईने संपूर्ण सागर पार्क परिसर सजवण्यात येणार असून, दहीहंडी सोहळ्याला भव्य स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
जयपूरहून येणार भव्य दहीहंडी बेस ( Jalgaon Dahi Handi 2026 )
यंदाच्या महोत्सवाचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे जयपूरहून विशेष भव्य दहीहंडी बेस मागवण्यात येणार आहे. या भव्य रचनेमुळे दहीहंडी सोहळ्याला वेगळे आकर्षण मिळणार आहे. गोविंदा पथकांकडून उंचच उंच मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडण्याचा थरार पाहण्यासाठी जळगावकरांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : धुळ्यात सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा; मराठा समाज आक्रमक
५०० फुटांची LED स्क्रीन ठरणार आकर्षण
दहीहंडी महोत्सवात यंदा तब्बल ५०० फुटांची LED स्क्रीन उभारण्यात येणार आहे. त्यामुळे कार्यक्रमातील प्रत्येक क्षण प्रेक्षकांना मोठ्या स्क्रीनवर पाहता येणार आहे. गोविंदा पथकांचे थर, दहीहंडी फोडण्याचा थरार आणि महोत्सवातील विविध कार्यक्रम मोठ्या स्वरूपात दाखवले जाणार असल्याने ही LED स्क्रीन यंदाच्या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर सागर पार्क परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. रंगीबेरंगी रोषणाई, भव्य सजावट आणि मराठमोळ्या वातावरणामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे.
एल. के. फाउंडेशनकडून जय्यत तयारी ( LK Foundation Dahi Handi )
एल. के. फाउंडेशनचे अध्यक्ष ललित कोल्हे आणि फाउंडेशनचे सदस्य पियुष कोल्हे यांनी यंदाच्या दहीहंडी महोत्सवाबाबत माहिती दिली. गेल्या १६ वर्षांची परंपरा यंदाही उत्साहात पुढे नेण्यासाठी तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे जळगावकरांचे लक्ष आता सागर पार्कवरील एल. के. फाउंडेशनच्या भव्य दहीहंडी महोत्सवाकडे लागले आहे. गोविंदा पथकांचा थरार आणि मराठमोळ्या जल्लोषाने यंदाचा दहीहंडी सोहळा रंगणार आहे.




