LS खानदेश

आपला आवाज, आपलं खानदेश
  • Home
  • ताज्या बातम्या
  • धुळ्यात दीड कोटींची फायर सिस्टीम; तरीही रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेवर प्रश्नचिन्ह!
धुळे

धुळ्यात दीड कोटींची फायर सिस्टीम; तरीही रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेवर प्रश्नचिन्ह!

Dhule Hospital Fire Safety

Dhule Hospital Fire Safety : अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता कक्षात लागलेल्या भीषण आगीत बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने राज्यातील रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. धुळे जिल्ह्यातही अशा दुर्घटना टाळण्यासाठी सर्व शासकीय रुग्णालयांचे तातडीने फायर ऑडिट करून अग्निसुरक्षा यंत्रणा सक्षम करावी, अशी मागणी आरंभ फाउंडेशन यांनी केली आहे. विशेष म्हणजे, धुळे महानगरपालिकेत फायर सिस्टीम उभारण्यासाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या यंत्रणेची सद्यस्थिती आणि कार्यक्षमता तपासण्याची गरज व्यक्त होत आहे.

सर्व शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याची मागणी ( Dhule Hospital Fire Safety )

धुळे महानगरपालिकेतील फायर सिस्टीम बसविण्याचे काम नांदेड येथील फायर प्रोटेक्टर कंपनीला देण्यात आले होते. दरम्यान, शहरातील व्यावसायिक आणि निवासी बांधकामांमध्ये अग्निसुरक्षेच्या नियमांचे पालन व्हावे, यासाठी आरंभ फाउंडेशनने सातत्याने पाठपुरावा केल्याचे शेवतकर यांनी सांगितले. २० जून २०२६ रोजी यासंदर्भात महानगरपालिका आयुक्तांना निवेदनही देण्यात आले होते.

आता अमरावतीतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांसह सर्व शासकीय आरोग्य संस्थांचे तातडीने फायर ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा : रावेरमध्ये विवाहितेवर अत्याचाराचा आरोप; फोटो व्हायरल करण्याची धमकी, पतीला मारहाण

यंत्रणेची सद्यस्थिती आणि कार्यक्षमता तपासण्याची गरज

रुग्णालयांतील अग्निशमन यंत्रणा, फायर अलार्म, स्मोक डिटेक्टर, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग आणि विद्युत यंत्रणेची तपासणी करावी. आढळलेल्या त्रुटी तातडीने दूर करून तपासणीचा अहवाल सार्वजनिक करावा. तसेच नियमित मॉक ड्रिल आणि कर्मचाऱ्यांना अग्निसुरक्षेचे प्रशिक्षण देणे अनिवार्य करावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

रुग्णालयांमध्ये नवजात बालके, गर्भवती महिला आणि गंभीर रुग्ण उपचार घेत असतात. त्यामुळे अग्निसुरक्षेतील हलगर्जी जीवघेणी ठरू शकते. दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा ती रोखण्यासाठी प्रशासनाने आधीच ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आरंभ फाउंडेशनने केली आहे. आता प्रशासन या मागणीवर किती तत्परतेने कार्यवाही करते, याकडे धुळेकरांचे लक्ष लागले आहे.

img

Harshad Kamble

Website Developer | SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics. Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur. I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. 🏆Awarded By :🥇 The Best Digital Marketer And Technologist Award.🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post