Nirmal Monani : जळगावमध्ये सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ५७ वर्षीय प्रौढाचा मृतदेह आवार शिवारात कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. निर्मल लालचंद मोनानी असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
निर्मल मोनानी हे सिंधी कॉलनीतील अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट वृद्धाश्रमात राहत होते. ते प्रज्ञाचक्षू असल्याने त्यांना व्यवस्थित बोलता येत नव्हते. १४ सप्टेंबर रोजी ते कोणालाही काहीही न सांगता वृद्धाश्रमातून निघून गेले होते. सर्वत्र शोध घेऊनही ते सापडले नाहीत. त्यामुळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती.
आवार शिवारातील शेतात आढळला मृतदेह ( Nirmal Monani )
दरम्यान, निर्मल मोनानी हे आवार ते विदगावदरम्यानच्या रस्त्यावर दोन ते तीन दिवसांपासून फिरत असल्याचे समोर आले. रविवारी सकाळी आवार शिवारातील रस्त्यालगत एका शेतात त्यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा काही भाग कुत्र्यांनी लचके तोडलेल्या अवस्थेत होता. पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब असल्याने जागेवरच शवविच्छेदन करण्याची पोलिसांनी विनंती केली. मात्र, डॉक्टरांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागल्याचा दावा करण्यात आला आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा : लाडकी बहीण योजनेत ५ हजार कोटींचा दावा! पुरुषांच्या खात्यातही पैसे; RTI मधून काय समोर








