जितेंद्र कोतवाल | जळगाव प्रतिनिधी
Jalgaon Crime News : जळगाव शहरातील कांचननगर परिसरात घरगुती वादातून महिलेच्या घरी जाऊन अश्लील शिवीगाळ, मारहाण आणि धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, 6 सप्टेंबर रोजी दुपारी दोन ते रात्री दहा वाजेच्या दरम्यान संबंधित आरोपी महिलेच्या घरी गेले होते. यावेळी तिघांनी संगनमत करून वाद घातल्याचा आणि अश्लील तसेच अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप आहे.
हेही वाचा : जैन हिल्सवर बैलपोळ्याचा जल्लोष! लेझीमच्या तालावर थिरकले विद्यार्थी, आदिवासी नृत्याने वेधले लक्ष
घरगुती वादातून प्रकार वाढल्याचा आरोप ( Jalgaon Crime News )
महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, वाद वाढल्यानंतर तिच्यासह पतीसोबत मारहाण करण्यात आली. तसेच आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. घरातील व्यक्तींना त्रास देणे आणि घरातील सामान अस्ताव्यस्त केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी सागर उर्फ बिडी सुरेश सपकाळे, माया सागर सपकाळे आणि ज्योती नावाच्या महिलेविरोधात शनीपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. तक्रारीतील आरोपांची चौकशी आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.








