LS खानदेश

आपला आवाज, आपलं खानदेश
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगावात ड्रग्सविरोधात पोलिसांची धडक कारवाई; एमडी, गांजा जप्त, तरुणाईच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गुन्हे

जळगावात ड्रग्सविरोधात पोलिसांची धडक कारवाई; एमडी, गांजा जप्त, तरुणाईच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Jalgaon Drug News

Jalgaon Drug News : तरुणाईच्या हातात पुस्तकं असायला हवीत… मात्र आज त्याच हातात नशेचे पदार्थ पोहोचत असल्याने चिंता वाढली आहे… ड्रग्स, गांजा आणि गावठी दारूच्या विळख्यात तरुण पिढी अडकत असल्याची धक्कादायक परिस्थिती समोर येतेय.

राज ठाकरेंनीही ड्रग्सच्या वाढत्या उपलब्धतेवर व्यक्त केली चिंता ( Jalgaon Drug News )

Raj Thackeray Drug Statement : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही नुकत्याच एका भाषणात आजची पिढी सहज उपलब्ध होणाऱ्या ड्रग्समुळे व्यसनाच्या आहारी जात असल्याची खंत व्यक्त केली…शाळांच्या बाहेर आणि टपऱ्यांवर ड्रग्जची विक्री सर्रास सुरू असल्याच राज ठाकरे यांनी म्हटलं आहे…
यामुळे विद्यार्थ्यांना नशेच्या विळख्यात ओढले जाण्याची भीती वाढली आहे….याच पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात ड्रग्सविरोधातील कारवायांनी आता वेग घेतला आहे.

गेल्या महिन्यात मीरा-भाईंदर पोलिसांनी जळगाव जिल्ह्यात येत थेट कारवाई केली… तब्बल ५ किलो एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले. या ड्रग्सची किंमत तब्बल सव्वा कोटी रुपयांपर्यंत असल्याची माहिती समोर आली. या कारवाईनंतर दुसऱ्याच दिवशी जळगाव पोलिसांनीही धडक कारवाई करत २ किलो एमडी ड्रग्स आणि २ किलो गांजा जप्त केला. याशिवाय गावठी दारूच्या हातभट्ट्यांवरही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा : खान्देशातून तरुण पुणे-मुंबईकडे नोकरीसाठी का धावतात? रोजगार, पगार आणि करिअरची संधी नेमकी कुठे?

बाहेरील पोलिसांनी कारवाई केली म्हणजे जळगाव पोलीस निष्क्रिय? ( Jalgaon Police Action )

मात्र, बाहेरील जिल्ह्यातील पोलिसांनी येऊन कारवाई केली म्हणून जळगाव पोलीस यंत्रणा निष्क्रिय आहे का? या प्रश्नावर मंत्री, पालकमंत्री आणि पोलीस प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस कुठल्याही भागात जाऊन कारवाई करू शकतात. जळगावचे पोलीसही दुसऱ्या भागात जाऊन कारवाई करतात. त्यामुळे बाहेरच्या पोलिसांनी कारवाई केली म्हणजे स्थानिक पोलीस काहीच करत नाहीत, असं म्हणता येणार नाही. दरम्यान, भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी एमआयडीसी परिसरातील बंद कंपन्यांची पाहणी करण्याची गरज असल्याचे मंत्री संजय सावकारे यांनी सांगितले.

बाहेरील पोलिसांनी कारवाई केली असेल तर ही चांगलीच बाब आहे. मात्र, जळगाव पोलिसांनीही गेल्या काही दिवसांत ड्रग्स, गांजा आणि गावठी हातभट्टीच्या दारूविरोधात अनेक कारवाया केल्या आहेत. ड्रग्स प्रकरणात प्रयागराज ते मुंबई आणि मुंबई ते जळगाव असे कनेक्शन समोर आल्याने मुंबई पोलिसांनी कारवाई केली. मात्र, त्याचा अर्थ जळगाव पोलीस कारवाई करत नाहीत असा होत नाही, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.

पोलिसांच्या कारवाईसोबत जनजागृतीही गरजेची

नशामुक्त भारतासाठी केवळ पोलिसांची कारवाई पुरेशी नाही… तरुणांसोबत थेट संवाद साधणेही तितकेच महत्त्वाचे आहे. शाळा-महाविद्यालयांच्या बाहेर किंवा टपऱ्यांवर नशेचे पदार्थ सहज उपलब्ध होत असतील, तर त्यावर नियंत्रणासोबतच युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे, असे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी सांगितले.

मीरा-भाईंदर पोलिसांच्या कारवाईनंतर दुसऱ्याच दिवशी जळगाव पोलिसांनी एमआयडीसी आणि नशिराबाद हद्दीत कारवाई केली. यामध्ये २ किलो ड्रग्स आणि २ किलो गांजा असा सुमारे ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.

एकीकडे पोलिसांची धडक कारवाई सुरू आहे… तर दुसरीकडे ड्रग्सचा तरुणाईपर्यंत पोहोचणारा मार्ग रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. कारवाई पोलिसांची… पण जबाबदारी समाजाचीही! पालकांनी आपल्या पाल्यांच्या वर्तणुकीकडे लक्ष द्यावे, युवकांशी संवाद साधावा आणि नशेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत… कारण आजचा तरुण वाचला, तरच उद्याचा विकसित भारत घडणार आहे!

img

Harshad Kamble

Website Developer | SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics. Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur. I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. 🏆Awarded By :🥇 The Best Digital Marketer And Technologist Award.🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post