LS खानदेश

आपला आवाज, आपलं खानदेश
  • Home
  • ताज्या बातम्या
  • टाकरखेडा येथे एकाच कुटुंबातील चौघांचा रेल्वेखाली मृत्यू. आत्महत्येपूर्वी व्हिडिओ;
जळगाव

टाकरखेडा येथे एकाच कुटुंबातील चौघांचा रेल्वेखाली मृत्यू. आत्महत्येपूर्वी व्हिडिओ;

Amalner Family Suicide
13
Amalner Family Suicide : तालुक्यातील टाकरखेडा येथे एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची संतापजनक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेत पती सुनील अमृत भिल, त्यांची पत्नी पार्वती भिल, मुलगा सनी आणि लहान मुलगा राज यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे टाकरखेडा परिसरासह संपूर्ण अमळनेर तालुक्यात तीव्र शोककळा पसरली आहे.

भावनिक व्हिडिओ आणि पोलिसांत गुन्हा दाखल ( Amalner Family Suicide )

आत्महत्येपूर्वी तरुणाने एक व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला होता. “माझ्या खिशात असलेल्या डायरीमध्ये नातेवाईक आणि परिचितांचे फोन नंबर लिहिलेले आहेत. आमच्या आत्महत्येनंतर त्या नंबरवर संपर्क साधून आम्हा चौघांवर एकत्र अंत्यसंस्कार करा,” अशी अत्यंत भावनिक हाक या तरुणाने व्हिडिओमध्ये मारली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेच्या प्रेमप्रकरणावरून कुटुंबात सातत्याने वाद निर्माण होत होते. याच मानसिक त्रासाला कंटाळून अखेर कुटुंबाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

या घटनेनंतर अमळनेर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी जलद गतीने कारवाई करत सीताराम उर्फ गटलू भील या संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे.

समाजाकडून कठोर कारवाईची मागणी ( Jalgaon family suicide )

दोन लहान चिमुकल्यांसह संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने भिल समाज बांधवांमध्ये आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या आणि प्रवृत्त करणाऱ्या आरोपीवर कडक कायदेशीर कारवाई करून त्याला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी जोरदार मागणी समाज बांधवांच्या वतीने करण्यात येत आहे. अमळनेर पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.
img

Harshad Kamble

Website Developer | SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics. Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur. I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. 🏆Awarded By :🥇 The Best Digital Marketer And Technologist Award.🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post