जितेंद्र कोतवाल | जळगाव प्रतिनिधी
Jalgaon Farmer Crop Damage : जामनेर तालुक्यातील सूनसगाव बुद्रुक येथे वांग्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे. शेतकरी विजय महाजन यांच्या शेतातील फवारणीच्या टाकीत अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळी काहीतरी द्रव्य मिसळल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
सकाळी शेतात पोहोचल्यानंतर महाजन यांनी वांग्याच्या पिकावर फवारणी केली. मात्र फवारणीनंतर काही वेळातच संपूर्ण पीक जळून गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे.
शेतकरी विजय महाजन यांनी काय आरोप केला? ( Jalgaon Farmer Crop Damage )
एकीकडे दुष्काळाचे संकट असताना दुसरीकडे पिकाचे नुकसान झाल्याने दुहेरी संकटाचा सामना करावा लागत असल्याची प्रतिक्रिया विजय महाजन यांनी दिली आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तीचा शोध घ्यावा, तसेच नुकसानग्रस्त पिकाची पाहणी करून शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र, पिकाचे नुकसान नेमके कशामुळे झाले आणि त्यामागे कोणाचा सहभाग आहे, हे चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा : महाराष्ट्रातील 255 तालुक्यांत दुष्काळ! विखे पाटलांचं मोठं आवाहन; ‘लग्न साधं करा, पाणी जपून वापरा’






