Shirpur Ganja Farming : वनविभागाच्या जमिनीवर गांजाची शेती, 82 लाख 50 हजार रुपये किंमतीचा 330 किलो गांजा जप्त….पुष्पा स्टाईल गांजा शेतीवर शिरपूर तालुका पोलिसांचा छापा, एकास अटक तर एक फरार…. शिरपूर तालुका पोलिसांची कारवाई, शिरपूर तालुका गांजाचा हब? तीन दिवसात दोन मोठ्या कारवाया….
वनविभागाच्या जमिनीवर कपाशी अन तुरीच्या पिकामध्ये करण्यात आलेली पुष्पा स्टाईल गांजा शेती शिरपूर तालुका पोलिसांनी उध्वस्त केली असून 82 लाख 50 हजार रुपये किमतीचा 330 किलो गांजा जप्त करत दीपक अभिमान पावरा (42) रा. चितारे शिरपूर याला ताब्यात घेतले असून त्याचा साथीदार मात्र फरार झाला आहे.
तीन दिवसांपूर्वीच थाळनेर पोलिसांनी देखील सुमारे 93 लाखांची गांजा शेती उध्वस्त केल्याची कारवाई ताजी असतानाच आज पुन्हा शिरपूर तालुका पोलिसांनी गांजा शेती उध्वस्त केल्याने खळबळ उडाली आहे. तीन दिवसात दोन मोठ्या कारवाया केल्याने शिरपूर तालुका गांजा शेतीचा हब बनतोय का?
कपाशी आणि तुरीच्या पिकामध्ये गांजाची लागवड ( Shirpur Ganja Farming )
शिरपूर तालुक्यातील अति दुर्गम भाग असणाऱ्या चिलारे परिसरात वन विभागाच्या जमिनीवर गांजा शेतीची लागवड केल्याची गुप्त माहिती शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी जयपाल हिरे यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी विविध प्रकारचे पथके तयार करत चीलारे भागात छापा टाकत गांजा शेती उध्वस्त केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिरपूर तालुक्यात जिल्हा पोलीस दलासह मुंबईच्या पथकाने देखील मोठ्या प्रमाणात गांजा शेतीवर कारवाई केल्याने शिरपूर तालुका गांजा शेतीचा तालुका बनतोय का?
हेही वाचा : एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवाला सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती;
कृषी विभागाच्या संयुक्त सर्वेक्षणाची मागणी ( Shirpur Ganja Farming )
मात्र या सर्व कारवाया करत असताना जिल्हा पोलीस दल, वनविभाग, अन कृषी विभागाने संयुक्त पथक तयार करत सखोल सर्वेक्षण करून शिरपूर तालुक्याला गांजा मुक्त तालुका करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या नेतृत्वात शिरपूर तालुका पोलिसांच्या पथकाने केली आहे.








