LS खानदेश

आपला आवाज, आपलं खानदेश
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगावच्या औद्योगिक विकासाला मोठी झेप! एमआयडीसीला ‘डी-प्लस’ दर्जा, रोजगाराच्या नव्या संधींची आशा
जळगाव

जळगावच्या औद्योगिक विकासाला मोठी झेप! एमआयडीसीला ‘डी-प्लस’ दर्जा, रोजगाराच्या नव्या संधींची आशा

Jalgaon MIDC D Plus
13
Jalgaon MIDC D Plus: जळगावच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील एमआयडीसीला डी-प्लस औद्योगिक दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भातील शासन निर्णय (GR) जारी केल्याची माहिती समोर आली आहे.

या निर्णयासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याचे सांगितले जात आहे. मुंबई येथे झालेल्या बैठकीत जळगाव एमआयडीसीला डी-प्लस दर्जा देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगावात परतल्यानंतर स्थानिक उद्योजकांनी त्यांचे स्वागत केले.

हेही वाचा : पालघरमध्ये १८ वर्षीय तरुणाच्या तक्रारीवरून २२ महिलांवर गुन्हा, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

उद्योजकांनी गुलाबराव पाटील यांना पुष्पगुच्छ देत तसेच पेढे भरवत या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. डी-प्लस दर्जामुळे जळगाव एमआयडीसीतील उद्योगांना विविध शासकीय सवलती आणि प्रोत्साहनपर योजनांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यमान उद्योगांच्या विस्ताराला तसेच नव्या गुंतवणुकीला अनुकूल वातावरण निर्माण होऊ शकते.

जळगावला डी-प्लस दर्जा मिळाल्याने राज्यातील मोठ्या उद्योगसमूहांचे लक्ष या भागाकडे वेधले जाण्याची शक्यता आहे. नव्या कंपन्या आणि उद्योग येथे आल्यास स्थानिक पातळीवर रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होऊ शकतात.

याचा सर्वाधिक फायदा जिल्ह्यातील तरुणांना होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रोजगारासाठी मुंबई, पुणे किंवा इतर मोठ्या शहरांकडे जाणाऱ्या तरुणांना भविष्यात जळगावमध्येच रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे. परिणामी स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळून जळगावच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला वेग येऊ शकतो.

या निर्णयाचे स्वागत करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी डी-प्लस दर्जामुळे जळगावच्या औद्योगिक क्षेत्रात सकारात्मक बदल घडतील, असा विश्वास व्यक्त केला. आता शासनाच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी आणि त्यातून प्रत्यक्षात किती नवीन गुंतवणूक व रोजगार निर्माण होतो, याकडे उद्योजकांचे लक्ष लागले आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे. माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील (Solapur) एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला. यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला. त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या. सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post