LS खानदेश

आपला आवाज, आपलं खानदेश
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगावच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम ऐक्य; मुस्लिम बांधवांकडून मानाच्या गणपतीचे स्वागत
जळगाव

जळगावच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम ऐक्य; मुस्लिम बांधवांकडून मानाच्या गणपतीचे स्वागत

Jalgaon Ganpati Visarjan
11

Jalgaon Ganpati Visarjan : जळगाव शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान आज हिंदू-मुस्लिम ऐक्याचे सुंदर दर्शन पाहायला मिळाले. जळगाव महानगरपालिकेच्या मानाच्या गणपतीचे मुस्लिम बांधवांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. दरम्यान, महानगरपालिका प्रशासन आणि हिंदू बांधवांच्या वतीने आप्पा महाराजांचे परममित्र लालशहा बाबा यांच्या दर्ग्यावर चादर अर्पण करण्यात आली. या माध्यमातून सामाजिक सलोखा आणि परस्पर सन्मानाचा संदेश देण्यात आला.

मुस्लिम बांधवांकडून मानाच्या गणपतीचे उत्साहात स्वागत ( Jalgaon Ganpati Visarjan )

यानंतर मानाचा गणपती विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर आल्यानंतर मुस्लिम बांधवांनी गणरायाचे स्वागत केले. गणेशोत्सव हा हिंदू बांधवांचा पारंपरिक सण असला तरी या उत्सवाच्या मिरवणुकीत मुस्लिम बांधवांनी सहभागी होत गणरायाला शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी, महापौर, आयुक्त यांच्यासह प्रशासनातील मान्यवरांचेही मुस्लिम बांधवांच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महानगरपालिकेच्या मानाच्या गणपतीची आरती करण्यात आली. गणेश विसर्जन मिरवणुकीला शुभेच्छा देताना मुस्लिम बांधवांनी सामाजिक एकतेचा संदेश दिला. त्यामुळे जळगावच्या विसर्जन मिरवणुकीत धार्मिक सलोखा, परस्पर सन्मान आणि बंधुभावाचे वातावरण पाहायला मिळाले.

img

Harshad Kamble

Website Developer | SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics. Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur. I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. 🏆Awarded By :🥇 The Best Digital Marketer And Technologist Award.🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post