LS खानदेश

आपला आवाज, आपलं खानदेश
  • Home
  • ताज्या बातम्या
  • लालबागच्या राजाच्या दर्शनाच्या रांगेत २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू; जयदीप नेमाडेंना नेमकं काय झालं?
गुन्हे

लालबागच्या राजाच्या दर्शनाच्या रांगेत २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू; जयदीप नेमाडेंना नेमकं काय झालं?

Jaideep Nemade Death
8

Jaideep Nemade Death : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जळगावहून मुंबईला गेलेला 25 वर्षीय इंजिनिअर जयदीप नेमाडे… बाप्पाचं दर्शन घेऊन आनंदाने घरी परतण्याचं स्वप्न घेऊन तो दर्शनाच्या रांगेत उभा राहिला होता. पण काही वेळातच या रांगेत असं काही घडलं, ज्यामुळे जयदीपचा दुर्दैवी अंत झाला. प्रचंड गर्दी, किलोमीटरपर्यंत लागलेली रांग आणि कोंदट वातावरणात अचानक जयदीपला अस्वस्थ वाटू लागलं… श्वास घेण्यास त्रास झाला आणि काही क्षणांतच तो बेशुद्ध होऊन खाली कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. प्राथमिक माहितीनुसार जयदीपचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं सांगितलं जातंय. मात्र, नातेवाईकांनी या कारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. जयदीप पूर्णपणे तंदुरुस्त होता, त्याला कोणताही आजार नव्हता, असा दावा नातेवाईक करत आहेत. मग दर्शनाच्या रांगेत नेमकं काय घडलं? गर्दी आणि कोंदट वातावरणामुळे जयदीपची प्रकृती बिघडली का? आणि या संपूर्ण व्यवस्थेत खरंच कुठे चूक झाली?

दर्शनाच्या रांगेत अचानक प्रकृती बिघडली ( Lalbaugcha Raja )

जळगावचा जयदीप नेमाडे… उच्चशिक्षित, तरुण आणि कुटुंबाचा एकुलता एक कमावता आधार. बाप्पाच्या दर्शनासाठी 17 सप्टेंबरच्या रात्री तो लालबागच्या राजाच्या  ( Lalbaugcha Raja ) दर्शनाच्या रांगेत उभा होता… पण त्या रात्री पुढच्या काही मिनिटांत काय घडणार आहे, याची कल्पनाही त्याला नव्हती. रात्री साडेअकराच्या सुमारास दर्शनाच्या रांगेत अचानक गर्दीचा दबाव वाढला… किलोमीटरपर्यंत पसरलेली रांग, पत्र्याच्या शेडमधलं कोंदट वातावरण आणि प्रचंड उकाडा… या सगळ्यामुळे भाविकांची मोठी कोंडी झाली होती, अशी माहिती आहे. याच गर्दीत जयदीपला अचानक अस्वस्थ वाटू लागलं… छातीत त्रास जाणवला आणि श्वास घेण्यासाठी त्याची धडपड सुरू झाली. काही क्षणांतच तो शुद्ध हरपून खाली कोसळला. मित्रांसह तिथे उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांनी तातडीने त्याला गर्दीतून बाहेर काढलं आणि रुग्णालयाकडे रवाना केलं. मात्र, नियतीला काही वेगळंच मंजूर होतं… रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच जयदीपचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केलं… आणि एका कुटुंबाचा आधार अचानक हिरावला गेला.

दरम्यान, जयदीपच्या मृत्यूचं प्राथमिक कारण समोर आलं आहे… वैद्यकीय अधिकारी आणि मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, दर्शनाच्या वेळी जयदीपला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंदही केली आहे. मात्र, या घटनेनंतर एक वेगळाच प्रश्न उपस्थित होतोय… कारण जयदीपच्या नातेवाईकांनी त्याच्या मृत्यूला केवळ हृदयविकाराचा झटका मानण्यास आक्षेप घेतला आहे. दर्शनाच्या रांगेतील गर्दी, कोंदट वातावरण आणि व्यवस्थेच्या अभावावर नातेवाईकांनी गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. त्यामुळे आता जयदीपच्या मृत्यूमागचं नेमकं कारण काय, यावरून प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

हेही वाचा : पाळधीत ३१ फूट उंच, १०० टन वजनाचा महागणपती; ५ हजार भाविकांचा २१ कोटी मंत्रजप

जयदीप यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय? ( Jaideep Nemade Death )

पण जयदीपच्या नातेवाईकांचं म्हणणं काही वेगळंच आहे… त्यांच्या माहितीनुसार जयदीप पूर्णपणे निरोगी आणि तंदुरुस्त होता. यापूर्वी त्याला हृदयाचा त्रास किंवा कोणताही गंभीर आजार नव्हता, असा दावा नातेवाईकांनी केला आहे. मग अचानक असा काय घडलं, की जयदीपचा जीव गेला? नातेवाईक थेट दर्शनाच्या रांगेतील व्यवस्थेवर सवाल उपस्थित करत आहेत. त्यांच्या आरोपानुसार, मैलोनमैल लांबलेल्या रांगेत हजारो भाविकांना पत्र्यांच्या शेडमध्ये उभं केलं जातं… गर्दी वाढली की कोंदटपणा, उकाडा आणि श्वास घेण्यास त्रास होण्याची परिस्थिती निर्माण होते. याच वातावरणामुळे जयदीपची प्रकृती बिघडली आणि त्याच्या जीवावर बेतलं, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. एवढ्या मोठ्या गर्दीचं नियोजन करताना सामान्य भाविकांच्या आरोग्याची आणि आपत्कालीन मदतीची पुरेशी व्यवस्था केली जाते का? जयदीपच्या मृत्यूनंतर आता हा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

जयदीपच्या जाण्याने नेमाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे… कष्टाने वाढवलेला एकुलता एक मुलगा गमावल्याने कुटुंबाचा आधारच हिरावला गेलाय. या दुःखातून नातेवाईकांनी प्रशासन आणि गणेशोत्सव मंडळाला एकच कळकळीची विनंती केली आहे… आमच्या कुटुंबाने जे गमावलं, ते पुन्हा कोणत्याही आई-वडिलांच्या वाट्याला येऊ नये. सामान्य भाविक तासन्‌तास रांगेत उभे राहतात… त्यामुळे गर्दीचं नियोजन अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध असावं, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. रांगेत पुरेशी जागा असावी… हवा खेळती राहावी… आपत्कालीन वैद्यकीय मदत तातडीने मिळावी… आणि गर्दीमुळे कोणाच्याही जीवाला धोका निर्माण होऊ नये, अशी त्यांची अपेक्षा आहे.

जयदीपवर जळगावमध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले… मात्र, त्याच्या मृत्यूनंतर सामान्य भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाची सुरक्षितता ही तितकीच महत्त्वाची आहे… त्यामुळे आता गर्दी व्यवस्थापन आणि आपत्कालीन सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रशासन आणि मंडळ काय पावलं उचलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

img

Harshad Kamble

Website Developer | SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics. Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur. I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. 🏆Awarded By :🥇 The Best Digital Marketer And Technologist Award.🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post