जितेंद्र कोतवाल | जळगाव प्रतिनिधी
Jalgaon Aadivasi Protest : जळगाव शहरातून आदिवासी बांधवांच्या आंदोलनाची मोठी बातमी समोर येत आहे. आदिवासी बांधवांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या आठ दिवसांपासून शिवतीर्थ मैदानावर आमरण उपोषण सुरू आहे. मात्र, आठ दिवस उलटूनही प्रशासनाकडून आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यात आलेली नाही किंवा त्यांच्या मागण्यांबाबत ठोस माहिती देण्यात आलेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
शिवतीर्थ मैदानावर आदिवासी बांधवांचे आंदोलन ( Jalgaon Aadivasi Protest )
प्रशासनाच्या या भूमिकेमुळे आदिवासी बांधवांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, आंदोलनस्थळी संताप व्यक्त करण्यात आला. विशेष म्हणजे, उपोषणादरम्यान दोन महिला आंदोलकांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आंदोलनाचा विषय अधिक गंभीर बनला आहे.
एकीकडे आठ दिवसांपासून उपोषण सुरू असताना दुसरीकडे प्रशासनाकडून अद्याप दखल घेतली जात नसल्याने आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रलंबित मागण्यांवर तातडीने चर्चा करून तोडगा काढावा, अशी मागणी आदिवासी बांधवांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा : गणेशोत्सवाच्या आनंदावर दुःखाचे सावट; जळगावात आई-मुलाच्या मृत्यूने हळहळ








