LS खानदेश

आपला आवाज, आपलं खानदेश
  • Home
  • ताज्या बातम्या
  • गणेशोत्सवाच्या आनंदावर दुःखाचे सावट; जळगावात आई-मुलाच्या मृत्यूने हळहळ
गुन्हे

गणेशोत्सवाच्या आनंदावर दुःखाचे सावट; जळगावात आई-मुलाच्या मृत्यूने हळहळ

Jalgaon Mother Son Death
13

Jalgaon Mother Son Death : जळगाव शहरात गणेशोत्सवाच्या उत्साहाला गालबोट लावणारी मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. तळेले कॉलनीतील विघ्नहर्ता चौक परिसरात आई आणि पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २८ वर्षीय हेमांगिनी महाजन आणि त्यांचा ५ वर्षीय मुलगा शौर्य यांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास हेमांगिनी या मुलासह घरात होत्या. त्यावेळी कुटुंबातील इतर सदस्य वरच्या मजल्यावर होते.

सायंकाळच्या सुमारास निखील महाजन यांच्या आई खाली आल्या असता घराचा दरवाजा उघडत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बराच वेळ दरवाजा न उघडल्याने त्यांनी कुटुंबातील इतर सदस्यांना याची माहिती दिली. त्यानंतर घरात पाहणी केली असता आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलिस घटनास्थळी ( Jalgaon Mother Son Death )

या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. आई आणि मुलाच्या मृत्यूमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करण्यात येत असून, टोकाचे पाऊल उचलण्यामागचे कारण काय होते, याचा शोध घेतला जात आहे.

हेही वाचा : जळगावमध्ये गणेशोत्सवात प्रसादाबाबत सावधान! FDA कडून विशेष सूचना

आई-मुलाच्या मृत्यूचे गूढ कायम

गणेशोत्सवाच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे तळेले कॉलनी परिसरात शोककळा पसरली आहे. हेमांगिनी आणि शौर्य यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली

img

Harshad Kamble

Website Developer | SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics. Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur. I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. 🏆Awarded By :🥇 The Best Digital Marketer And Technologist Award.🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post