LS खानदेश

आपला आवाज, आपलं खानदेश
  • Home
  • लाईफस्टाईल
  • जळगावात ‘शाडू’चा नवा ट्रेंड; ‘या’ गणेशमूर्तींना मिळत आहे यंदा मोठी मागणी
जळगाव

जळगावात ‘शाडू’चा नवा ट्रेंड; ‘या’ गणेशमूर्तींना मिळत आहे यंदा मोठी मागणी

Jalgaon Shadu clay Ganesh Idols
1716

जळगाव | जितेंद्र कोतवाल

Jalgaon Shadu clay Ganesh Idols: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील बाजारपेठेत विविध प्रकारच्या गणेशमूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत.

यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांचा कल वाढत असून, रायगड जिल्ह्यातील पेण येथून आणलेल्या शाडू मातीच्या आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्तींना (Jalgaon Shadu Ganesh idols) विशेष मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

विविध आकारांच्या मूर्ती उपलब्ध

जळगावमधील श्री गणेश कला केंद्र येथे पेण येथील कारागिरांनी तयार केलेल्या शाडू मातीच्या विविध आकारांच्या मूर्ती उपलब्ध आहेत. नैसर्गिक मातीचा वापर करून तसेच नैसर्गिक रंगांच्या साहाय्याने या मूर्ती तयार (Shadu clay Ganesh idols) केल्या जातात. सुबक कलाकुसर, आकर्षक रूप आणि पर्यावरणपूरकता ही या मूर्तींची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. विसर्जनानंतर या मूर्ती सहजपणे मातीमध्ये मिसळत असल्याने पर्यावरणावर होणारा परिणाम तुलनेने कमी राहतो.

हेही वाचा: 

यंदा दहा टक्क्यांनी वाढ

यंदा मात्र वाहतुकीच्या खर्चात वाढ झाल्याने शाडू मातीच्या गणेशमूर्तींच्या किमतीत मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. कच्चा माल, रंग तसेच मूर्ती जळगावपर्यंत पोहोचविण्याचा वाढलेला खर्च यामुळे दर वाढल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. मात्र, दर वाढले असतानाही ग्राहकांकडून या मूर्तींना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पारंपरिक पद्धतीसोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश

सहा इंचांपासून अडीच फुटांपर्यंतच्या विविध आकारांच्या मूर्ती येथे उपलब्ध आहेत. घरगुती गणेशोत्सवासाठी लहान आकाराच्या मूर्तींना मागणी असून, छोट्या सार्वजनिक गणेश मंडळांकडूनही पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तींना पसंती दिली जात आहे. पारंपरिक पद्धतीसोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी अनेक कुटुंबे शाडू मातीची मूर्ती निवडत आहेत.

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मूर्तींच्या किमती काही प्रमाणात वाढल्या असल्या, तरी मागणीमध्येही वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. त्यामुळे गणेशोत्सवाच्या दिवसांत शाडू मातीच्या गणेशमूर्तींच्या विक्रीत आणखी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या दिशेने जळगावकरांचा वाढता कल यानिमित्ताने अधोरेखित होत आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे. माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील (Solapur) एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला. यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला. त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या. सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post