Dhule Jagannath Puri Temple : धुळे शहरातील मोहाडी येथील श्री पिंपळादेवी येथे नवरात्रोत्सवानिमित्त ओडिशातील जगन्नाथ पुरी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. पुरी येथे प्रत्यक्ष दर्शनासाठी जाऊ न शकणाऱ्या भाविकांना या देखाव्याच्या माध्यमातून जगन्नाथ मंदिराचे दर्शन घडत आहे. हा देखावा पाहण्यासाठी धुळे शहरासह जिल्ह्यातील आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत.
हेही वाचा : Jalgaon Accident: जळगावमध्ये भीषण अपघात! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू
पिंपळादेवी मित्र मंडळाचा धार्मिक देखाव्यांचा उपक्रम ( Dhule Jagannath Puri Temple )
पिंपळादेवी मित्र मंडळातर्फे दरवर्षी नवनवीन धार्मिक देखावे आणि उपक्रम राबवले जातात. यापूर्वी मंडळाने खाटू श्याम आणि केदारनाथ मंदिराचे आकर्षक देखावे साकारले होते. यंदा जगन्नाथ पुरी मंदिराची प्रतिकृती साकारून भाविकांना अनोखी धार्मिक अनुभूती दिली आहे.
दरम्यान, मंडळाच्या परिसरात गरबा खेळण्यासाठी महिला आणि तरुणांचीही मोठी उपस्थिती असते. आकर्षक देखावा आणि धार्मिक वातावरणामुळे परिसरातील नागरिकांकडून मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.








