LS खानदेश

आपला आवाज, आपलं खानदेश
  • Home
  • ताज्या बातम्या
  • एका रिक्षाच्या प्रवासाने हिरावलं १६ वर्षांच्या अर्जुनचं आयुष्य; जबाबदार कोण?
गुन्हे

एका रिक्षाच्या प्रवासाने हिरावलं १६ वर्षांच्या अर्जुनचं आयुष्य; जबाबदार कोण?

Arjun Koli Death

Arjun Koli Death : शाळा सुटली… विद्यार्थी घरी निघाले… पण एका चुकीच्या निर्णयाने सगळंच बदललं! बस आली नाही… म्हणून मुलांनी मालवाहू रिक्षा पकडली…अखेर मुलांनी मालवाहू रिक्षा पकडली… आणि काही क्षणांतच होत्याचं नव्हतं झालं…अनेक विद्यार्थी जखमी झाले…आणि दुसऱ्याच दिवशी १६ वर्षांच्या अर्जुनची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली….पण बस का आली नाही? मुलांना मालवाहू रिक्षातून प्रवास का करावा लागला? आणि अर्जुनच्या मृत्यूला जबाबदार कोण?आणि अर्जुनच्या मृत्यूने कोणते गंभीर प्रश्न उभे केले?चला जाणून घेऊयात…..

उमाळा-कंडारी रस्त्यावर भीषण अपघात; १० विद्यार्थी जखमी ( Arjun Koli Death )

सोमवारी शाळा सुटली… आणि विद्यार्थी घरी जाण्यासाठी निघाले! कंडारी गावातील १६ वर्षांचा अर्जुन कोळीही त्यांच्यासोबत होता. नववीत शिकणाऱ्या अर्जुनसह इतर विद्यार्थी बसची वाट पाहत होते. मात्र, बस वेळेवर आलीच नाही! अखेर विद्यार्थ्यांनी खासगी मालवाहू रिक्षातून घरी जाण्याचा निर्णय घेतला. पण उमाळा-कंडारी रस्त्यावर या रिक्षाला भीषण अपघात झाला. रिक्षाचालकासह दहा विद्यार्थी जखमी झाले. गंभीर जखमी अर्जुनला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कुटुंबीयांना तो सुखरूप परत येईल, अशी आशा होती… पण मंगळवारी सकाळी आठ वाजता ही आशा संपली! उपचार सुरू असतानाच अर्जुनचा मृत्यू झाला. त्याचा चुलत भाऊ कल्पेशही जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. एका बाजूला कुटुंबाचा आक्रोश… तर दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाचा गंभीर प्रश्न! बस वेळेवर आली असती, तर अर्जुनवर ही वेळ आली असती का?

आई-वडिलांनी मुलाला शाळेत पाठवलं ते शिक्षण घेऊन सुखरूप घरी परत यावं म्हणून… पण शाळेतून घरी परतण्याचा प्रवास एका कुटुंबासाठी आयुष्यभराची वेदना देऊन गेला! ज्या वयात हातात पुस्तकं असायला हवीत, डोळ्यांत मोठी स्वप्नं असायला हवीत, त्याच वयात १६ वर्षांच्या अर्जुन कोळीचा प्रवास कायमचा थांबला… आणि मागे उरले ते आई-वडिलांचे अश्रू, कुटुंबाचा आक्रोश आणि संपूर्ण गावाला सुन्न करणारा प्रश्न! अखेर विद्यार्थ्यांच्या जीवाची किंमत नेमकी किती? आणि शाळेत जाण्या-येण्याचा प्रवास इतका असुरक्षित का? उमाळा-कंडारी रस्त्यावर घडलेल्या भीषण रिक्षा अपघाताने पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.

हेही वाचा : गरब्याच्या मैदानात अमृता फडणवीसांचा ठेका! ‘मारी महिसागर’ची चर्चा

शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांनी घेतला खासगी रिक्षाचा आधार

या घटनेतील सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विद्यार्थ्यांना वेळेवर बस उपलब्ध न होणं. बसची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना अखेर खासगी मालवाहू रिक्षातून प्रवास करावा लागला. मात्र, विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी हे वाहन कितपत सुरक्षित होतं? त्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी होते का? अपघात नेमका कशामुळे झाला? या प्रश्नांची उत्तरं तपासातून स्पष्ट होणं गरजेचं आहे.

विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात पारधी येथेही बसमध्ये चढताना चाकाखाली येऊन दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर एका बसमधून दीडशेहून अधिक विद्यार्थी प्रवास करत असल्याचा मुद्दा समोर आला होता. विद्यार्थ्यांची गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त बसेस सोडण्याची मागणीही करण्यात आली होती.

अतिरिक्त बसेस आणि सुरक्षित वाहतुकीची मागणी ( Umala Kandari Road Accident )

मात्र, त्यानंतरही विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न कायम असेल, तर या मागण्यांचं पुढे काय झालं? बससेवा नियमित करण्यासाठी कोणती ठोस पावलं उचलण्यात आली? आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित पर्याय उपलब्ध करून देण्याची जबाबदारी नेमकी कोणाची?
दरम्यान, विद्यार्थ्यांची निष्काळजीपणे वाहतूक केल्याच्या प्रकरणात संबंधित रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस पुढील तपास करत आहेत. दोषींवर कारवाई होणं आवश्यकच आहे. मात्र, केवळ अपघातानंतर गुन्हा दाखल करून प्रश्न सुटणार आहे का? विद्यार्थ्यांना वेळेवर बस मिळाली असती, सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था असती आणि नियमांचं काटेकोर पालन झालं असतं, तर ही वेळ आली असती का? याचं उत्तर शोधण्याची गरज आहे.

कारण आज अर्जुन कोळीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे; उद्या अशाच एखाद्या कुटुंबावर ही वेळ येणार नाही, याची खात्री कोण देणार? अर्जुन आता परत येणार नाही… पण त्याच्या मृत्यूतून तरी यंत्रणा जागी होणार का? विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी आणि घरी परतण्यासाठी सुरक्षित प्रवास मिळणार का? की आणखी एखाद्या निष्पाप जीवाचा बळी गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार?
प्रश्न एका अर्जुनचा नाही… प्रश्न आहे शाळेत जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवाचा!

img

Harshad Kamble

Website Developer | SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics. Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur. I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. 🏆Awarded By :🥇 The Best Digital Marketer And Technologist Award.🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post