Tapi River Couple Death : प्रेमविवाह… संसाराची नवी सुरुवात…एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याची स्वप्नं… सुखी संसाराची आशा… पण याच संसाराचा असा दुर्दैवी शेवट होईल, याची कुणालाही कल्पना नव्हती! दोघांच्याही पायांना लोखंडी साखळी… साखळीला चक्क कुलूप! तापी नदीत आढळले पती-पत्नीचे मृतदेह! हे दृश्य पाहून परिसरात खळबळ! प्रेमविवाह केलेल्या श्याम-सपनासोबत नेमकं काय घडलं? दोघांच्या मृत्यूमागचं गूढ काय? या रहस्यमय घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत! पण दोघांच्या पायांना साखळी का बांधली होती? कुलूप लावण्यामागचं कारण काय? आणि या दाम्पत्याच्या मृत्यूमागे नेमकं काय घडलं?
सावळदे येथील तापी नदीत दाम्पत्याचे मृतदेह ( Tapi River News )
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सावळदे येथील तापी नदीपात्रात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नदीच्या पाण्यात आढळले दोन मृतदेह… आणि या मृतदेहांबाबत समोर आलेल्या एका तपशीलाने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. हे मृतदेह होते एका तरुण दाम्पत्याचे. श्याम हरी पाटील, वय २८ वर्षे, आणि नासीमा खातून मुल्ला ऊर्फ सपना श्याम पाटील, वय २० वर्षे, अशी त्यांची नावे आहेत. दोघेही जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील मूळ रहिवासी होते. सध्या ते एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे वास्तव्यास होते. ८ ऑक्टोबर रोजी तापी नदीपात्रात त्यांचे मृतदेह आढळले. घटनेची माहिती मिळताच नरडाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी नरडाणा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.
मात्र, या घटनेत सर्वाधिक धक्कादायक बाब होती ती म्हणजे दोघांच्या पायांना एकमेकांशी लोखंडी साखळीने बांधण्यात आले होते आणि त्या साखळीला कुलूप लावलेलं होतं. त्यामुळे या घटनेबाबतचं गूढ अधिकच वाढलं आहे. मात्र, या घटनेत समोर आलेल्या एका तपशीलाने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. पंचनाम्यादरम्यान दोघांच्याही पायांना लोखंडी साखळीने एकमेकांना बांधलेले असल्याचे आढळले. एवढंच नाही, तर या साखळीला कुलूपही लावलेलं होतं. त्यामुळे या घटनेचं गूढ अधिकच वाढलं आहे. ही साखळी कोणी बांधली? त्याला कुलूप का लावण्यात आलं? आणि दाम्पत्याचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला? या प्रश्नांची उत्तरं अद्याप समोर आलेली नाहीत.
हेही वाचा : १४ वर्षांच्या चिन्मयचा विजेच्या धक्क्याने मृत्यू! जळगावच्या वारकरी शाळेत दुर्दैवी घटना
दाम्पत्याच्या मृत्यूमागील कारण अद्याप अस्पष्ट ( Tapi River Couple Death )
या घटनेतील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे श्याम आणि सपनाने प्रेमविवाह केला होता. उत्राण येथे दोघांची ओळख झाली आणि त्यानंतर त्यांनी विवाह केला. श्याम शेती आणि ट्रॅक्टर चालवण्याचं काम करत होता. घटनेपूर्वी या दाम्पत्याने नातेवाइकांना फोन केल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र, या फोनमधून नेमकं काय बोलणं झालं होतं, याचा तपशील स्पष्ट झालेला नाही. या प्रकरणात आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात असला, तरी मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी पोलीस तपास महत्त्वाचा ठरणार आहे.
दरम्यान, सावळदे येथील तापी पुलावर आत्महत्येच्या घटना वारंवार घडत असल्याने या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पुलावर अशा घटना रोखण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पावलं उचलली जाणार का, हा प्रश्नही उपस्थित होत आहे. एका बाजूला तापी नदीत आढळलेले दाम्पत्याचे मृतदेह, दुसरीकडे पायांना बांधलेली लोखंडी साखळी आणि त्याला लावलेलं कुलूप! या प्रत्येक बाबीमुळे प्रकरणातील गूढ वाढलं आहे. श्याम आणि सपनाचा मृत्यू नेमका कसा झाला? या घटनेमागे काय कारण आहे? या सर्व प्रश्नांचा उलगडा आता नरडाणा पोलिसांच्या तपासातूनच होणार आहे.








