LS खानदेश

आपला आवाज, आपलं खानदेश
  • Home
  • राजकारण
  • चंद्रकांत पाटलांनी घेतले मुक्ताईचे दर्शन; नाथाभाऊ खडसेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
जळगाव

चंद्रकांत पाटलांनी घेतले मुक्ताईचे दर्शन; नाथाभाऊ खडसेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Chandrakant Patil
17

 संपूर्ण महाराष्ट्राच्या कल्याणासाठी मुक्ताईला प्रार्थना ( Chandrakant Patil )

Chandrakant Patil : संपूर्ण महाराष्ट्राचे कल्याण व्हावे आणि त्यासाठी मुक्ताईच्या चरणी प्रार्थना केली. समाजातील जेवढे घटक आहेत, त्या सर्व घटकांना सुख, आनंद आणि सुरक्षा मिळाली पाहिजे. सरकारकडून सध्या जे काम सुरू आहे, ते पूर्ण करण्यासाठी सरकारला मुक्ताईने बळ द्यावे, अशी प्रार्थना केली.

 एकनाथराव खडसे यांना शुभेच्छा ( Eknath Khadse )

मी एकनाथराव खडसे यांना शुभेच्छा देण्यासाठीच कोथळी येथे आलो आहे. या निमित्ताने या ठिकाणी मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मात्र, मला पुण्यातील एका कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे लागणार असल्याने आज मी एकनाथराव खडसे यांची भेट घेतली. त्यानंतर आदिशक्ती मुक्ताईचे दर्शन घेतले आणि एकनाथराव खडसे यांचा सत्कार केला.

हेही वाचा : मंगला एक्सप्रेस मध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा; भुसावळ स्थानकावर तातडीने वैद्यकीय यंत्रणा

 एकनाथराव खडसे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा

१९८० मध्ये विद्यार्थी परिषदेसाठी मी जेव्हा घर सोडले, त्यावेळी एकनाथराव खडसे हे जिल्हा परिषदेचे सदस्य होते. त्यानंतर ते आमदार झाले आणि पुढे आमदारकीसोबतच त्यांनी राज्यातील विविध मंत्रिपदांची जबाबदारी स्वीकारली व कामकाज पाहिले. भारतीय जनता पक्षाला उभे करण्यात नाथाभाऊंचा मोठा हातभार आहे. इतकेच नाही, तर महाराष्ट्रातही भाजपला मजबूत करण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे.

महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून, म्हणजे १९६० पासून आजपर्यंत अनेक नेत्यांनी महाराष्ट्र घडवला आहे. अशा अनेक मोठ्या नेत्यांची यादी आहे आणि या यादीमध्ये नाथाभाऊंचेही नाव आहे. त्यांनी ७४ वर्षे पूर्ण करून ७५व्या वर्षात पदार्पण केले आहे. सध्या त्यांची प्रकृती फारशी चांगली राहत नाही. ती उत्तम राहावी आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

img

Harshad Kamble

Website Developer | SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics. Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur. I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. 🏆Awarded By :🥇 The Best Digital Marketer And Technologist Award.🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post