LS खानदेश

आपला आवाज, आपलं खानदेश
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पंटर पाठवला, खातरजमा केली अन् थेट छापा; अकलूदच्या कुंटणखान्यावर पोलिसांचा दणका!
जळगाव

पंटर पाठवला, खातरजमा केली अन् थेट छापा; अकलूदच्या कुंटणखान्यावर पोलिसांचा दणका!

Aklud prostitution raid
22

Aklud Prostitution Raid: यावल तालुक्यातील अकलूद गावाच्या शिवारात तापी नदीकाठच्या एका दुमजली घरात सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी आधी पंटरच्या माध्यमातून ठिकाणाची खातरजमा केली आणि माहितीची पुष्टी झाल्यानंतर रात्री सुमारे आठ वाजता घरावर अचानक छापा टाकला. या कारवाईत चार महिलांची सुटका करण्यात आली असून, कुंटणखाना चालवल्याप्रकरणी मनीषा प्रकाश झोपे (वय ४५, रा. अकलूद, ता. यावल) हिच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अकलूद गावाच्या शिवारात तापी नदीच्या काठावर असलेल्या दुमजली घरात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचे नियोजन करण्यात आले.

हेही वाचा:  मुलीवर हात टाकाल तर…; अमित ठाकरेंचा ABVPला थेट इशारा

यासाठी यावल पोलीस ठाणे, निंभोरा पोलीस ठाणे आणि उपविभागीय पोलीस कार्यालय, फैजपूर येथील अधिकारी व अंमलदारांचे संयुक्त पथक तयार करण्यात आले. कारवाईपूर्वी पंटरच्या माध्यमातून संबंधित ठिकाणी जाऊन माहितीची खातरजमा करण्यात आली. संशयाची पुष्टी झाल्यानंतर पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने घरावर छापा टाकला.

पोलिसांच्या कारवाईदरम्यान घरामध्ये वेश्याव्यवसायासाठी स्वतंत्र खोल्या तयार करण्यात आल्याचे समोर आले. या खोल्यांचा ग्राहकांसाठी वापर केला जात असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले. त्यामुळे या ठिकाणी हा प्रकार नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

छाप्यादरम्यान वेश्याव्यवसायात अडकलेल्या चार महिलांची पोलिसांनी सुटका केली. त्यापैकी तीन महिला पश्चिम बंगालमधील असून त्या सध्या भुसावळ येथे वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. तर चौथी महिला भुसावळ येथील असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, या घरात हा प्रकार नेमका किती काळापासून सुरू होता, तसेच यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. घराची रचना आणि करण्यात आलेली व्यवस्था पाहता हा प्रकार काही काळापासून सुरू असण्याची शक्यता तपास यंत्रणेकडून व्यक्त केली जात आहे.

तापी नदीकाठच्या शांत परिसरातील दुमजली घरात अशा प्रकारचा व्यवसाय सुरू असल्याचे समोर आल्याने अकलूद परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर परिसरातील अवैध धंद्यांवरही प्रश्न उपस्थित झाले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे. माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील (Solapur) एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला. यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला. त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या. सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post