LS खानदेश

आपला आवाज, आपलं खानदेश
  • Home
  • ताज्या बातम्या
  • मंगला एक्सप्रेस मध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा; भुसावळ स्थानकावर तातडीने वैद्यकीय यंत्रणा
जळगाव

मंगला एक्सप्रेस मध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा; भुसावळ स्थानकावर तातडीने वैद्यकीय यंत्रणा

Mangala Express

Mangala Express : दिल्लीहून त्रिचूल येथे शैक्षणिक सहलीसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांच्या गटाला रेल्वे प्रवासादरम्यान विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. हजरत निजामुद्दीन ते एर्नाकुलम जाणाऱ्या मंगला एक्सप्रेसमध्ये हा प्रकार घडला.
भोपाल रेल्वे स्थानकावर जेवण केल्यानंतर काही विद्यार्थ्यांना अचानक उलट्या आणि मळमळ होण्यास सुरुवात झाली. विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळताच प्रवाशांनी खंडवा रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधला. त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांसह मेडिकल आणि कमर्शियल टीम खंडवा स्थानकावर दाखल झाली.

हेही वाचा : आदर्श शिक्षक’ पुरस्कार मिळवणारे मुख्याध्यापकच पेपरफुटीत अडकले!

मंगला एक्सप्रेस मध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा ( Mangala Express Student Food Poisoning )

प्रकृती अस्वस्थ असलेल्या विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार आणि औषधे देण्यात आली. प्रकृतीत सुधारणा न झाल्यास खंडवा स्थानकावर उतरून उपचार घेण्याचा सल्लाही रेल्वे अधिकाऱ्यांनी दिला.
दरम्यान, मंगला एक्सप्रेस रात्री भुसावळ रेल्वे स्थानकावर पोहोचताच भुसावळ विभागानेही विद्यार्थ्यांसाठी विशेष वैद्यकीय व्यवस्था केली. डॉक्टर, नर्स, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह आपत्कालीन परिस्थितीसाठी ॲम्बुलन्सची व्यवस्था करण्यात आली होती.

Bhusawal Railway Station : गाडी भुसावळ स्थानकावर आल्यानंतर डॉक्टरांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली. या वैद्यकीय तपासणीसाठी मंगला एक्सप्रेस सुमारे पाऊण तास थांबवण्यात आली. विद्यार्थ्यांची तपासणी पूर्ण झाल्यानंतरच गाडी पुढे रवाना करण्यात आली.
या सहलीमध्ये एकूण 93 विद्यार्थी आणि 12 शिक्षक आहेत. त्यापैकी सुमारे 25 ते 30 विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळ असा त्रास झाला, तर पाच विद्यार्थ्यांची प्रकृती अधिक बिघडली होती. सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली असून, खबरदारी म्हणून काही डॉक्टरांना विद्यार्थ्यांसोबत पुढील प्रवासासाठी पाठवण्यात आले आहे.

जेवणामुळे विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असण्याची शक्यता व्यक्त होत असली, तरी नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

img

Harshad Kamble

Website Developer | SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics. Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur. I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. 🏆Awarded By :🥇 The Best Digital Marketer And Technologist Award.🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post