Dhule Cancer Hospital : धुळेकरांच्या आरोग्य सेवेला आणखी बळकटी देणारी मोठी घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली आहे.
“आरोग्य यंत्रणेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चांगले काम करा; आगामी काळात धुळ्यात 200 बेडच्या कॅन्सर हॉस्पिटलचे उद्घाटन करू,” असे आश्वासन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. आरोग्य यंत्रणेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी चांगले काम करावे आणि आगामी काळात धुळ्यात 200 बेड क्षमतेच्या कॅन्सर रुग्णालयाचे उद्घाटन करण्याचा मानस असल्याचे आश्वासन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
हेही वाचा : पंटर पाठवला, खातरजमा केली अन् थेट छापा; अकलूदच्या कुंटणखान्यावर पोलिसांचा दणका!
100 बेडच्या महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण ( Dhule Cancer Hospital )
धुळे जिल्हा रुग्णालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या 100 बेडच्या महिला व बालकल्याण रुग्णालयासह अत्याधुनिक शवविच्छेदन गृहाचे लोकार्पण शुक्रवारी, 21 ऑगस्ट रोजी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले.
गेल्या काही महिन्यांपासून 100 बेडचे महिला व बाल रुग्णालय तयार होते. मात्र मंत्र्यांच्या वेळेअभावी त्याचे अधिकृत लोकार्पण रखडले होते. दरम्यान, रुग्णालय सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आले होते. त्यामुळे अनेक रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेतला.
धुळेकरांच्या आरोग्य सेवेला मिळणार आणखी बळकटी ( Dhule Cancer Hospital )
अत्याधुनिक व सर्व सुविधायुक्त असलेल रुग्णालय सर्वसामान्य धुळेकरांच्या सेवेत समर्पित करण्यात आले आहे. यावेळी रुग्णसेवा अधिक दर्जेदार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असं आश्वासन उपस्थित मंत्र्यांसह लोकप्रतिनिधींनी दिले आहे.
लोकार्पण सोहळ्यात बोलताना आरोग्यमंत्री आबिटकर यांनी आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले. अत्याधुनिक आणि सर्व सुविधांनी सुसज्ज हे रुग्णालय धुळेकरांच्या सेवेसाठी समर्पित करण्यात आले असून, भविष्यात आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार अनुप अग्रवाल, आमदार राम भदाणे, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, महापौर मायादेवी परदेशी, सिव्हिल सर्जन डॉ. रवींद्र सोनवणे, डॉ. अजित पाठक, शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे, डॉ. तुळशीराम गावित यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.


