LS खानदेश

आपला आवाज, आपलं खानदेश
  • Home
  • राजकारण
  • जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीतच संघर्ष! 21 जागांचं गणित काय?
जळगाव

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीतच संघर्ष! 21 जागांचं गणित काय?

Jalgaon District Bank Election 2026

Jalgaon District Bank Election 2026: जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक… २१ जागा… ४०० हून अधिक उमेदवार… आणि जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला! कुठे बिनविरोध निवडीचा डाव यशस्वी झालाय, तर कुठे उमेदवारीवरून राजकीय संघर्ष पेटलाय! विशेष म्हणजे, महायुतीतच जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे. उद्या उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने पडद्यामागच्या राजकीय हालचालींना वेग आलाय. कोण मैदान सोडणार आणि कोण लढतीत कायम राहणार? जिल्हा बँकेच्या सत्तेचा हा सस्पेन्स नेमका काय आहे?

जळगाव जिल्हा बँकेच्या 3 जागांवर बिनविरोध निवड (Jalgaon District Bank Election 2026)

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (Jalgaon Bank Election) सुरुवातीलाच काही नेत्यांनी बाजी मारली आहे. २१ जागांपैकी तब्बल तीन जागांवर बिनविरोध निवडीचं चित्र स्पष्ट झालंय. यामध्ये शिंदे गटाने दोन, तर भाजपने एका जागेवर आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. शिंदे गटाचे आमदार अमोल पाटील यांच्या कुटुंबातील दोन उमेदवारांनी बिनविरोध विजय मिळवला आहे. आमदार अमोल पाटील यांच्या आई नलिनी चिमणराव पाटील आणि पत्नी मृणाल अमोल पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर भाजपचे मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांनी भुसावळ मतदारसंघातून बाजी मारली आहे. मात्र, या तीन जागांवरील बिनविरोध निवडीनंतर उर्वरित १८ जागांसाठी राजकीय गणितं अधिकच रंगू लागली आहेत.

या निवडणुकीत उमेदवारी अर्जांच्या छाननीदरम्यानही अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. पाचोरा मतदारसंघातून आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज सुरुवातीला बाद करण्यात आला होता. मात्र, नाशिक येथील सहाय्यक आयुक्तांकडे दाद मागितल्यानंतर त्यांचा अर्ज वैध ठरवण्यात आला. त्यामुळे सुमित पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे, जामनेर मतदारसंघात मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात रघुनाथ पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला. त्यानंतर नाशिक येथे केलेलं आव्हानही फेटाळण्यात आल्याने गिरीश महाजन यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा : जळगाव शहरासह भुसावळ, वरणगावमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मुक्ताईनगर, पाचोरा आणि यावलमध्ये महायुतीचा पेच

मात्र, खरी राजकीय रंगत आहे ती मुक्ताईनगर, पाचोरा आणि यावलमधील समीकरणांची! महायुतीचे घटक पक्ष असतानाही काही मतदारसंघांत मित्रपक्षांचेच नेते आमनेसामने आल्याचं चित्र आहे. आमदार चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या राजकीय गटांमध्ये उमेदवारीवरून संघर्ष निर्माण झाल्याने महायुतीसमोर जागावाटपाचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात उमेदवार उतरवले असल्याने हा तिढा कसा सुटणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. मुक्ताईनगर, यावल आणि पाचोरा या मतदारसंघांतील अंतिम समीकरणं माघारीनंतरच स्पष्ट होणार आहेत. या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, प्रतापराव पाटील, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

दरम्यान, जिल्हा बँकेची निवडणूक महायुतीच्या माध्यमातूनच लढवली जाणार असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा करून जागावाटपाचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलंय. तर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनीही जागावाटपाचा निर्णय ज्येष्ठ नेते गिरीश महाजन घेतील आणि ते जो निर्णय सांगतील, तो आम्हाला मान्य असेल, अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे आता महायुतीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? कोणत्या मतदारसंघात कोणाला संधी मिळणार? आणि बंडखोरांची समजूत काढण्यात नेत्यांना यश येणार का? हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.

29 नोव्हेंबरला मतदान, 30 नोव्हेंबरला मतमोजणी

१७ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज माघारीचा अंतिम दिवस आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील अनेक राजकीय चित्रं स्पष्ट होणार आहेत. २९ नोव्हेंबरला मतदान, तर ३० नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आता उत्सुकता आहे ती जिल्हा बँकेच्या सत्तेवर नेमकं कोण वर्चस्व मिळवणार याची! तीन जागांवर बिनविरोध विजय मिळाला असला, तरी उर्वरित १८ जागांवर कोण बाजी मारणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

img

Harshad Kamble

Website Developer | SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics. Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur. I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. 🏆Awarded By :🥇 The Best Digital Marketer And Technologist Award.🏆 # HARSHAD KAMBLE **Website Developer | SEO & Digital Marketing Specialist** Pune, Maharashtra, India Phone: [Your Mobile Number] | Email: [Your Email Address] LinkedIn: [Your LinkedIn Profile] --- ## PROFESSIONAL SUMMARY Website Developer and SEO Specialist with hands-on experience in WordPress website management, Search Engine Optimization, technical website troubleshooting, digital content optimization and organic growth strategies. Experienced in managing news websites, optimizing content for search engines, analyzing Google Search Console performance and improving website structure, speed and search visibility. Skilled in WordPress, Elementor, Rank Math SEO and website performance monitoring. Looking for opportunities to contribute to web development, SEO and digital growth projects. ## PROFESSIONAL EXPERIENCE ### LS Marathi – Website Developer & SEO Specialist **Pune, Maharashtra | Current** - Manage and maintain the LS Marathi news website using WordPress. - Manage website pages, layouts, navigation, categories, header, footer and website structure. - Work with Elementor to design, update and optimize website pages and layouts. - Implement On-Page SEO and Technical SEO strategies to improve organic search visibility. - Conduct keyword research, search intent analysis and competitor research for news content. - Optimize SEO titles, meta descriptions, URLs, headings, image alt text and internal linking. - Manage SEO optimization using Rank Math. - Monitor website performance, indexing and organic search data using Google Search Console. - Analyze search impressions, clicks, CTR, keyword positions and SEO performance. - Optimize content for Google Search, Google Discover and AI-powered search experiences. - Work on GEO (Generative Engine Optimization) and content structuring for AI search visibility. - Troubleshoot WordPress errors, website loading issues, caching, hosting and technical performance problems. - Coordinate website content publishing, SEO strategy and digital growth activities. ### Digital Grow Online – Digital Marketer & SEO / Website Specialist **Pune, Maharashtra | 1 Year** - Worked on digital marketing and Search Engine Optimization activities. - Performed keyword research and SEO content optimization. - Managed website-related tasks and WordPress content updates. - Optimized website content, metadata, headings and URLs. - Worked on improving website visibility through organic search strategies. - Monitored SEO performance and supported website growth initiatives. - Assisted with website management and digital marketing campaigns. --- ## TECHNICAL SKILLS **Website & CMS** - WordPress Website Management - Elementor - Website Structure & Layout Management - Content Management Systems (CMS) **Search Engine Optimization** - On-Page SEO - Technical SEO - Off-Page SEO Fundamentals - Keyword Research - Search Intent Analysis - Competitor Analysis - SEO Content Optimization - Internal Linking - Metadata Optimization - Image SEO **SEO & Analytics Tools** - Google Search Console - Rank Math SEO - Google Analytics 4 (GA4) – [Include if proficient] - Google Tag Manager – [Include if proficient] **Website Optimization** - Website Speed Optimization - Core Web Vitals Fundamentals - Website Indexing & Crawlability - Sitemap & Robots.txt - Website Troubleshooting - Cache & Performance Optimization - Hosting Management **Digital Marketing** - Organic Traffic Growth - Content Strategy - SERP Analysis - Google Discover Optimization - GEO (Generative Engine Optimization) - AI Search Optimization --- ## KEY PROJECT ### LS Marathi – Marathi Digital News Website **Website:** https://lokshevay.com/ - Managed SEO and website operations for a Marathi digital news platform. - Worked on website structure, category pages, news publishing and SEO implementation. - Optimized news articles using SEO and GEO techniques. - Worked on improving organic search visibility and content discoverability. - Monitored website performance and search data. - Handled website maintenance, technical troubleshooting and optimization. --- ## EDUCATION --- ## CORE STRENGTHS - SEO Strategy & Execution - Website Management - Problem Solving & Technical Troubleshooting - Analytical Thinking - Content Optimization - Search Engine Visibility - Website Performance Monitoring - Digital Growth Strategy --- ## CAREER OBJECTIVE To build a career in SEO, Website Development and Digital Marketing by applying my practical experience in WordPress website management, technical SEO, website optimization and organic growth. I aim to contribute to an organization’s digital presence, search visibility, website performance and long-term growth while continuously upgrading my technical and analytical skills.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post