LS खानदेश

आपला आवाज, आपलं खानदेश
  • Home
  • ताज्या बातम्या
  • शाळा सुटताच बससाठी गर्दी; एका चुकीच्या क्षणाने 16 वर्षीय विद्यार्थिनीचा जीव घेतला
गुन्हे

शाळा सुटताच बससाठी गर्दी; एका चुकीच्या क्षणाने 16 वर्षीय विद्यार्थिनीचा जीव घेतला

Jalgaon Paldhi Bus Accident | Rajnandini Shinde
6

Jalgaon Paldhi Bus Accident : शाळा सुटली होती… विद्यार्थी घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत होते… बस आली आणि नेहमीप्रमाणे बसमध्ये चढण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी झाली. पण याच गर्दीत पुढच्या काही सेकंदांत असं काही घडलं, ज्यामुळे एका १६ वर्षीय विद्यार्थिनीचा जीव गेला. नेमकं काय घडलं? राजनंदिनी बसखाली कशी आली? आणि या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा इतका मोठा प्रश्न का निर्माण झाला?

पाळधीत नेमकं काय घडलं? ( Jalgaon Paldhi Bus Accident )

जळगावच्या पाळधी परिसरात शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांची बस पकडण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. गावाकडे जाण्यासाठी विद्यार्थी बसमध्ये चढत होते. याचवेळी पाळधी येथील झंवर विद्यालयात दहावीत शिकणारी १६ वर्षीय राजनंदिनी शिंदेही ( Rajnandini Shinde ) बसमध्ये चढत होती. मात्र बसमध्ये चढताना अचानक तिचा पाय घसरला. राजनंदिनी खाली पडली आणि दुर्दैवाने ती थेट बसखाली आली. काही क्षणांतच घडलेल्या या दुर्घटनेत बसखाली चिरडून राजनंदिनीचा मृत्यू झाला.

एका क्षणापूर्वी शाळेत असलेली राजनंदिनी घरी जाण्यासाठी बस पकडत होती. मात्र काही सेकंदांतच तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. राजनंदिनी ही पाळधी येथील झंवर विद्यालयात दहावीत शिकत होती. शाळेतून घरी परतताना तिच्यासोबत ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर पाळधी परिसरात हळहळ व्यक्त होत असतानाच शाळेत जाणाऱ्या आणि शाळेतून घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.कारण शाळा सुटण्याच्या वेळेत अनेक ठिकाणी बससाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होते. एकाच बसमध्ये चढण्यासाठी विद्यार्थ्यांची अक्षरशः झुंबड उडते. बस आली की प्रत्येक विद्यार्थ्याला आधी बसमध्ये चढायची घाई असते. अशा वेळी एखाद्या विद्यार्थ्याचा तोल गेला, तर त्याची किंमत थेट जीवावर बेतू शकते. पाळधीतील या घटनेनंतर ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बसेस सोडण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा : लाडकी बहीण योजना बंद होणार का? शेतकरी कर्जमाफी, मोफत वीजवरही फेरआढावा; सरकारचा मोठा निर्णय

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी उपाययोजना होणार का? ( Paldhi Bus Accident )

आता प्रश्न असा आहे की, शाळकरी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बससेवा उपलब्ध करून देता येईल का? शाळा सुटण्याच्या वेळेनुसार बसच्या फेऱ्या वाढवता येतील का? बसमध्ये चढताना विद्यार्थ्यांची गर्दी होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून ठोस व्यवस्था करता येईल का? कारण हा केवळ वाहतुकीचा प्रश्न नाही, तर विद्यार्थ्यांच्या जीविताचा प्रश्न आहे.

पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवतात. मुलांनी शिकून मोठं व्हावं आणि शाळेतून सुरक्षितपणे घरी परतावं, हीच प्रत्येक पालकाची अपेक्षा असते. मात्र शाळा सुटल्यानंतर बस पकडताना जर विद्यार्थ्यांना गर्दीतून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असेल, तर ही परिस्थिती गांभीर्याने घेण्याची गरज आहे. पाळधीतील राजनंदिनीचा दुर्दैवी अंत झाला. पण तिच्यासारख्या इतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आता काय उपाययोजना होणार? विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बसेस वाढणार का? शाळा सुटण्याच्या वेळेत बसची संख्या वाढवली जाणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाला आता प्राधान्य मिळणार का? कारण राजनंदिनीचा जीव गेला, पण तिच्या मृत्यूनंतर उभा राहिलेला प्रश्न प्रत्येक पालकाच्या मनात आहे… शाळेत जाणारी मुलं सुरक्षितपणे घरी परतणार कधी?

img

Harshad Kamble

Website Developer | SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics. Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur. I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. 🏆Awarded By :🥇 The Best Digital Marketer And Technologist Award.🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post