LS खानदेश

आपला आवाज, आपलं खानदेश
  • Home
  • ताज्या बातम्या
  • विसर्जनाच्या काही तास आधी 50 ढोल फोडले! शिवगंध पथकाला मोठा धक्का; जळगावात नेमकं काय घडलं?
जळगाव

विसर्जनाच्या काही तास आधी 50 ढोल फोडले! शिवगंध पथकाला मोठा धक्का; जळगावात नेमकं काय घडलं?

Jalgaon Dhol Tasha Pathak
310

Jalgaon Dhol Tasha Pathak : तीन महिन्यांची मेहनत… १०१ ढोलांचा संकल्प… विसर्जन मिरवणुकीसाठी सगळं काही तयार…..पण मिरवणूक सुरू होण्याच्या काही तास आधीच असा धक्कादायक प्रकार घडला, की संपूर्ण ढोल पथक हादरलं….रात्रीच्या अंधारात नेमकं काय घडलं, ज्यामुळे पथकाला सकाळी मोठा धक्का बसला?….!

विसर्जनाच्या काही तास आधी शिवगंध पथकाला मोठा धक्का ( Jalgaon Dhol Tasha Pathak )

12 वर्षांची परंपरा असलेलं शिवगंध ढोल ताशा पथक….गणेश विसर्जनासाठी तीन महिन्यांपासून सुरू असलेला सराव… १०१ ढोल वाजवण्याचा संकल्प… आणि १२ वर्षांची परंपरा जपणाऱ्या शिवगंध ढोल पथकाची जय्यत तयारी सुरू होती. मात्र विसर्जनाच्या काही तास आधीच या उत्साहाला गालबोट लागलं. जळगावच्या खानदेश सेंट्रल मॉल परिसरात ठेवलेल्या पथकाच्या ढोलांवर मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी धारदार हत्याराने वार केल्याचा आरोप आहे. सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर ५० हून अधिक ढोल फाटल्याचं निदर्शनास आलं आणि पथकाला तब्बल २ ते अडीच लाख रुपयांचं नुकसान झालं. ज्या ढोलांच्या तालावर गणरायाला निरोप देण्यासाठी पथक सज्ज झालं होतं, तेच ढोल मिरवणुकीच्या काही तास आधी खराब झाल्याने सदस्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं. या प्रकरणी पथकाच्या सदस्यांनी पोलिसांत तक्रार दिली असून, ढोलांचं नुकसान करणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा : 265 तालुके दुष्काळग्रस्त! शेतकऱ्यांना नुकसानभरपाई कधी मिळणार? गिरीश महाजनांनी दिली मोठी माहिती

खान्देश सेंट्रल मॉल परिसरात नेमकं काय घडलं? ( Shivgandh Dhol Tasha )

यंदा १०१ ढोल वाजवण्याचा निर्धार केला होता… मात्र या निर्धाराच्या वाटेतच आडकाठी आणण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप शिवगंध ढोल-ताशा पथकाकडून करण्यात आला आहे. प्रतिस्पर्ध्यांकडून आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा पथकाच्या सदस्यांनी केला आहे. मात्र, “मागे खेचण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही मागे हटणार नाही,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. तब्बल ५० हून अधिक ढोलांचं नुकसान झाल्यानंतरही अवघ्या दोन तासांत ढोलांचा मेंटेनन्स करून १०१ ढोल वाजवणारच, असा निर्धार पथकाने केला आहे. त्यामुळे आता या अडथळ्याला न जुमानता शिवगंध ढोल-ताशा पथक आपली ताकद दाखवणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

५० हून अधिक ढोलांचं नुकसान झालं, पण निर्धार कायम आहे… अवघ्या दोन तासांत ढोल दुरुस्त करून १०१ ढोल वाजवण्याचं शिवगंध पथकाने ठरवलंय. आता आडकाठी करणाऱ्यांना उत्तर देत, शिवगंधचा नाद पुन्हा घुमणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

img

Harshad Kamble

Website Developer | SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics. Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur. I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. 🏆Awarded By :🥇 The Best Digital Marketer And Technologist Award.🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post