LS खानदेश

आपला आवाज, आपलं खानदेश
  • Home
  • ताज्या बातम्या
  • सोन्यात भेसळ करण्याचा नवा प्रकार! 22 कॅरेट हॉलमार्क असूनही निघतंय 20 कॅरेट सोने
लाईफस्टाईल

सोन्यात भेसळ करण्याचा नवा प्रकार! 22 कॅरेट हॉलमार्क असूनही निघतंय 20 कॅरेट सोने

Gold Purity | Rhenium Powder in Gold
20

Gold Purity: चीननंतर भारत हा जगातील सोन्याचा दुसरा सर्वात मोठा उपभोक्ता आहे. गेल्या वर्षी भारतानं विक्रमी ७२.४ अब्ज डॉलर्स किमतीचं ६४० टन सोनं आयात केलं होतं. पण एका ताज्या रिपोर्टमुळं देशात येणाऱ्या सोन्याच्या शुद्धतेवर (Gold Purity) प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. सोन्याचं वजन वाढवण्यासाठी त्यात रेनियम पावडर (Rhenium Powder in Gold) मिसळली जात असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आलाय. विशेष म्हणजे ही भेसळ लगेच ओळखता येत नाही. तपासण्या केल्यानंतरही अशा दागिन्याला २२ कॅरेट शुद्धतेचा हॉलमार्क मिळतो पण प्रत्यक्षात त्यांची शुद्धता २० कॅरेटचीच निघते. त्यामुळं तुम्ही घेत असलेलं सोनं शुद्ध आहे की त्यात भेसळ केलेली आहे, याची खात्री करून घ्यावी लागणार आहे.

सोन्यात रेनियम पावडरची भेसळ? (Gold Purity)

एका इंग्रजी वृत्तसंस्थनं दिलेल्या माहितीनुसार, या भेसळीमागंही चीनचा संबंध आहे. चीनमधल्या शेन्झेन शहरातील एक कंपनी रेनियम पावडर बनवते. या कंपनीचे डीलर भारतातील अनेक शहरांत आहेत. सोन्याचं वजन वाढवण्यासाठी त्यात रेनियम पावडर मिसळली जाते. ही भेसळ केल्यानंतरही दागिने खरेच वाटतात. अनेक तपासण्या केल्या तरी त्यातली ही भेसळ पकडली जात नाही. काही तपासणी यंत्रं अशा पावडर मिश्रित सोन्याला शुद्धच ठरवतात. सोन्यामध्ये ही पावडर २५ टक्क्यांपर्यंत मिसळता येते. म्हणजे एक तोळा सोन्यात पाव तोळा इतकी रेनियम पावडर मिसळली जाऊ शकते.

चीनमधून रेनियम पावडरचा नमुना मागवून सोन्यात भेसळ कशी केली जाते याचा प्रयोग करून पाहिल्याचा दावा या अहवालात केलाय. या प्रयोगासाठी चिनी एजंटशी संपर्क साधून मुंबईतल्या एका डीलरमार्फत रेनियमचा एक ग्रॅम नमुना मिळवण्यात आला. नंतर जोधपूरमधल्या एका सोनाराच्या मदतीनं याचा वापर दागिन्यासाठी करण्यात आला. एका सोनाराच्या मदतीनं या नमुन्यावर प्रयोग करण्यात आला. ७.८३ ग्रॅमचे २४ कॅरेट सोनं घेऊन त्यात १ ग्रॅम रेनियम पावडर मिसळण्यात आली. यातून ८.८३ ग्रॅमचा दागिना बनवण्यात आला. पुढं या दागिन्याची तपासणी केली असता हॉलमार्किंग केंद्रावर या दागिन्याला २२ कॅरेट शुद्धतेचं प्रमाणपत्र मिळालं. प्रत्यक्षात दागिन्यात सोन्याचं प्रमाण ८१.७३ टक्के आढळलं. ही शुद्धता २० कॅरेट इतकी होते. हा भेसळयुक्त दागिना अनेक ज्वेलरी शोरूम आणि टेस्टिंग सेंटरमध्ये तपासण्यात आला. पण कुठेही ही भेसळ पकडली गेली नाही. दागिना सर्वत्र पास झाला.

हेही वाचा : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण! आजचा 22K, 24K सोन्याचा भाव किती? चांदीही स्वस्त

रेनियम पावडर नेमकी काय आहे? (Rhenium Powder)

या रेनियम पावडरचा उपयोग रासायनिक आणि पेट्रोलियम शुद्धीकरणात उत्प्रेरक म्हणूनही केला जातो. वैद्यकीय एक्स-रे आणि ॲनोड प्लेट्ससारख्या विशेष घटकांच्या निर्मितीमध्येही याचा वापर होतो. रेनियम पावडर तयार करण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. सर्वप्रथम मॉलिब्डेनम असलेल्या तांब्याच्या खनिजातून अमोनियम परबोरेटच्या स्वरूपात रेनियम काढलं जातं. त्यानंतर, उच्च तापमानात हायड्रोजन वायूमध्ये मिसळून त्याचं रुपांतर धातूच्या पावडरमध्ये केलं जातं.

त्याची किंमत शुद्धतेनुसार प्रति १०० ग्रॅम ३,००० ते ३,४०० डॉलरपर्यंत असते. रेनियमची घनता अंदाजे २१ ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर इतकी असते, तर सोन्याची घनता अंदाजे १९.३ ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर असते. त्यामुळं, जेव्हा रेनियम सोन्यात मिसळलं जातं, तेव्हा तयार होणाऱ्या मिश्रणाची घनता फारशी बदलत नाही, परंतु हे मिसळल्यानं सोन्याचं वजन मात्र वाढलेलं असतं. एका रिपोर्टनुसार, एक्स-रे फ्लोरोसेन्स विश्लेषण आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीसारख्या प्रगत तंत्रज्ञानानं सोन्यातील बाहेरील धातू ओळखता येतो.

हेही वाचा : खान्देशातील टॉप 10 कॉलेज! जळगाव, धुळे आणि नंदुरबारमधील नामांकित महाविद्यालयांची माहिती

सोन्याची तपासणी करणारी यंत्रं भेसळ पकडण्यात अपयशी?

सध्याच्या शुद्धता मोजण्याच्या पारंपरिक पद्धती सोन्यातील या पावडरचे मिश्रण शोधण्यात अयशस्वी ठरत आहेत. या तपासणी यंत्रणा आणि हॉलमार्किंग प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. त्यामुळं आता सोन्यात रेनियम पावडरची (Rhenium Powder) भेसळ शोधण्याची विश्वासार्ह यंत्रणा तातडीनं उभारावी लागणार आहे. दागिने घेताना पुरेशी काळजी घ्यावी लागणार आहे. केवळ हॉलमार्क पाहून निश्चिंतपणे सोनं खरेदी करणं आता धोक्याचं ठरू शकतं. फसवणूक टाळण्यासाठी विश्वासार्ह विक्रेत्याकडूनच हॉलमार्क असलेले दागिने खरेदी करावे. खरेदी करण्यापूर्वी शुद्धतेची तपासणी करून घ्यावी, खरेदीचे बिल आणि जीएसटी इनव्हॉइस जपून ठेवावे असा सल्ला सर्वांना दिला जात आहे.

img

Harshad Kamble

Website Developer | SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics. Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur. I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. 🏆Awarded By :🥇 The Best Digital Marketer And Technologist Award.🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post