कारच्या धडकेत ट्रकही पलटला युवा उद्योजक जागीच गेला भयानक व्हिडिओ

मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवे म्हणजे मुंबई पुणे मिसिंग लिंक…हा देशातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि महत्त्वाच्या महामार्गांपैकी एक म्हणून ओळखला जातो. याच महामार्गावरील प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी मिसिंग लिंक प्रकल्प झाला, मात्र इथं नियोजनाचा आभाव दिसला, कारण महत्त्वाकांक्षी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या बोगद्यामध्ये रात्रीच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला आहे. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातामध्ये पिंपरी-चिंचवड आणि वाकड परिसरातील युवा उद्योजक तुषार भूमकर यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना त्यांच्या आलिशान फॉर्च्युनर कारने समोरील मालवाहू टेम्पोला पाठीमागून दिलेल्या प्रचंड धडकेमुळे हा अपघात झाला. या धडकेची तीव्रता इतकी भयानक होती की, कारचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला आणि त्यातच तुषार भूमकर यांनी आपले प्राण गमावले. तर कारमधील अन्य एक सहकारी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या अपघातातून कारमधील इतर तिघे जण सुदैवाने आणि चमत्कारिकरीत्या बचावले आहेत. हा एवढा भीषण अपघात नेमका कसा घडला? पाहूयात या व्हिडिओतून… नमस्कार मी… या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवड, वाकड तसेच राजकीय, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रात प्रचंड शोककळा पसरली असून सर्व स्तरांतून तीव्र हळहळ आणि दुःख व्यक्त केले जात आहे. मात्र, या भीषण अपघाताच्या निमित्ताने महामार्ग प्रशासन आणि रस्ते विकास महामंडळाच्या अत्यंत निष्काळजी आणि बेजबाबदार कारभाराचे जाहीर वाभाडे निघाले असून, या मृत्यूला नेमके जबाबदार कोण, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. हा भीषण आणि दुर्दैवी अपघात मध्यरात्री साधारण दीड वाजण्याच्या सुमारास घडला. घटनास्थळावरून समोर आलेल्या धक्कादायक व्हिडिओ फुटेजवरून, अपघाताची भीषणता आणि त्यामागील कारणांची साखळी स्पष्ट होते. पुण्याकडून अत्यंत वेगाने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या फॉर्च्युनर कारचा प्रवास सुरळीत सुरू होता. कारमध्ये तुषार भूमकर यांच्यासह त्यांचे इतर सहकारी आणि मित्र प्रवास करत होते. रात्रीची वेळ असल्याने महामार्गावर वाहनांचा वेग चांगलाच असतो, त्यातच एक्सप्रेसवेच्या ‘मिसिंग लिंक’ अंतर्गत नव्याने तयार करण्यात आलेल्या भव्य बोगद्यामधून कार जात असताना अचानक समोर एक अनपेक्षित अडथळा निर्माण झाला. बोगद्याच्या आत उजव्या बाजूला काही गाड्या थांबलेल्या होत्या आणि तिथे रस्त्याचे किंवा बोगद्यातील यंत्रणेचे काहीतरी तांत्रिक काम सुरू असल्याचे दिसून येत होते. ((तीन ते चार वेळा धडक दाखवा) या कामामुळे पुढे जाणाऱ्या वाहनांचा वेग अचानक मंदावला होता आणि काही वाहने जागीच थांबली होती. तुषार भूमकर यांची भरधाव कार जेव्हा या थांबलेल्या वाहनांच्या जवळ पोहोचली, तेव्हा अचानक समोर आलेल्या या परिस्थितीमुळे चालकाला गाडीवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले. कारच्या उजव्या बाजूला रस्ता ओलांडून पुढे जाण्यासाठी अत्यंत अरुंद आणि अपुरी जागा शिल्लक होती. डाव्या बाजूने जात असलेल्या फॉर्च्युनर कारला उजवीकडे वळवण्यासाठी पुरेशी जागा आणि वेळ न मिळाल्यामुळे, ही कार अत्यंत वेगाने थेट समोरअत्यंत संथ गतीने चाललेल्या मालवाहू टेम्पोच्या पाठीमागील भागावर जाऊन प्रचंड ताकदीने आदळली. या धडकेचा आवाज बोगद्यात प्रचंड वेगाने घुमला आणि आजूबाजूला असलेल्या कर्मचाऱ्यांचा आणि इतर वाहनचालकांचा काळजाचा थरकाप उडाला. धडक इतकी भीषण होती की फॉर्च्युनर कारच्या समोरील इंजिनचा आणि चालकाच्या बाजूचा संपूर्ण भाग अक्षरशः कापला गेल्यासारखा चक्काचूर झाला. गाडीच्या सुरक्षेसाठी असणारे एअरबॅग्ज उघडले गेले खरे, परंतु धडकेचा जोर आणि वाहनाचा वेग एवढा जास्त होता की गाडीच्या पत्र्याचा आणि इंजिनचा भाग थेट आतपर्यंत घुसला. या भयानक आघातात कारमध्ये पुढच्या बाजूला बसलेले युवा उद्योजक तुषार भूमकर यांना अत्यंत गंभीर आणि जीवघेणी दुखापत झाली. त्यांच्या डोक्याला, छातीला आणि अंतर्गत अवयवांना बसलेल्या प्रचंड फटक्यामुळे त्यांचा घटनास्थळीच आणि जागीच मृत्यू झाला. त्यांच्या शरीरातून प्रचंड रक्तस्राव झाला होता आणि वैद्यकीय मदत मिळेपर्यंत त्यांचा श्वास संपला होता. या कारमध्ये त्यांच्यासोबत प्रवास करत असलेला दुसरा एक सहकारी देखील या धडकेत गंभीररीत्या चिरडला गेला. त्याच्या अंगावर आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या असून, त्याला घटनास्थळावरून तात्काळ बाहेर काढून बिर्ला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत असून वैद्यकीय पथक त्याचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. सुदैवाने कारच्या पाठीमागील सीटवर बसलेले इतर तिघे जण या संपूर्ण अपघातातून सुरक्षित राहिले असून त्यांना किरकोळ खरचटले आहे, मात्र डोळ्यांसमोर घडलेला हा मृत्यूचा थरार पाहून ते प्रचंड मानसिक धक्क्यात आहेत. या संपूर्ण अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस यंत्रणांनी तात्काळ बोगद्यात धाव घेतली. अपघातग्रस्त वाहनांमधून जखमींना आणि मृतदेह बाहेर काढण्याचे काम अत्यंत शर्थीचे होते, कारण कारचा पत्रा पूर्णपणे एकमेकांत अडकला होता. कटरच्या साहाय्याने कारचा भाग बाजूला करून तुषार भूमकर यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. अपघातानंतर बोगद्यातील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली होती, कारण अपघातग्रस्त फॉर्च्युनर कार आणि मालवाहू टेम्पो रस्त्याच्या मधोमध अडकून पडले होते. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने ही दोन्ही वाहने बाजूला करून बोगद्यातील रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत केला. मात्र, या अपघाताचा जो व्हिडिओ आता समोर आला आहे, तो पाहिल्यानंतर हा केवळ एक अपघात नसून महामार्ग प्रशासनाने केलेला निष्काळजीपणाचा पराकोटीचा नमुना आहे, असा थेट आरोप आता सर्व स्तरातून केला जात आहे. या अपघाताने महामार्गावरील प्रवासी सुरक्षेच्या दाव्यांच्या चिंधड्या उडवल्या आहेत. या अपघातामागचे सर्वात मुख्य आणि धक्कादायक कारण म्हणजे घटनास्थळी प्रशासनाने बाळगलेली प्रचंड बेजबाबदार वृत्ती होय. रात्रीच्या वेळी जेव्हा एक्सप्रेसवेसारख्या अतिवेगवान रस्त्यावर, तेही एका बंदिस्त बोगद्याच्या आत जर कोणतेही काम सुरू ठेवायचे असेल, तर त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे आणि जागतिक सुरक्षा मानकांचे अतिशय कडक नियम आहेत. नियमांनुसार काम सुरू असलेल्या ठिकाणापासून किमान दोनशे ते पाचशे मीटर आधीच वाहनचालकांना स्पष्ट दिसेल असे मोठे रिफ्लेक्टर, चमकणारे सूचना फलक, डिजिटल साईन बोर्ड आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मजबूत बॅरिकेटिंग लावणे अत्यंत बंधनकारक असते. जेणेकरून अतिवेगाने येणाऱ्या वाहनचालकाला पुढे रस्ता बंद आहे किंवा कामामुळे एकाच लेनमधून वाहतूक सुरू आहे याची पूर्वकल्पना येईल आणि तो आपल्या वाहनाचा वेग योग्य वेळी नियंत्रित करू शकेल. परंतु, मिसिंग लिंकच्या या बोगद्यात रात्री दीड वाजता जेव्हा हे काम सुरू होते, तेव्हा तिथे कोणत्याही प्रकारचे बॅरिकेटिंग करण्यात आलेले नव्हते. संपूर्ण व्हिडिओमध्ये कुठेही सुरक्षेच्या उपाययोजना किंवा योग्य रिफ्लेक्टर्स लावलेले दिसत नाहीत. मुख्य आणि प्रचंड वाहतूक असलेल्या या रस्त्यावर अचानक एक साईड ब्लॉक करून काम सुरू ठेवणे आणि वाहनचालकांना कोणतीही पूर्वसूचना न देणे ही प्रशासनाची अक्षम्य चूक ठरली आहे. अंधाऱ्या बोगद्यात अचानक समोर गाड्या थांबलेल्या दिसल्यास अत्यंत हुशार आणि अनुभवी चालकाचाही गोंधळ उडू शकतो, कारण डोळे बोगद्याच्या प्रकाशाशी आणि वेगाशी जुळवून घेत असतात. नेमकी हीच परिस्थिती तुषार भूमकर यांच्या कारचालकासोबत घडली असण्याची दाट शक्यता आहे. उजव्या बाजूला गाडी काढण्यासाठी पुरेशी जागा शिल्लक न ठेवता रस्त्याचा कडा अडवून काम करणे आणि तिथे साधी प्लास्टिकची लाईन किंवा बॅरिकेट न लावणे यावरून आता प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जर तिथे योग्य बॅरिकेटिंग असते किंवा काही अंतरावर चालकाला सतर्क करणारे दिवे लावले असते, तर कदाचित कारचा वेग कमी करता आला असता आणि तुषार भूमकर यांचा जीव वाचू शकला असता. त्यामुळे हा अपघात नसून प्रशासनाने सुरक्षेकडे केलेल्या दुर्लक्षामुळे झालेला हा एक प्रकारे बळीच आहे, अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे….

Read More

हा संपूर्ण वाद अमरावती येथे आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमापासून सुरू झाला.

विदर्भाची पारंपरिक खाद्यसंस्कृती असलेल्या प्रसिद्ध सावजी मटणावरून सध्या संपूर्ण महाराष्ट्रात एक मोठा वाद पेटला आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभाग अर्थात एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सावजी जेवणाबाबत केलेल्या एका विधानामुळे या वादाला फोडणी मिळाली असून, त्यावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट आणि आक्रमक शब्दांत पलटवार केला आहे. प्रशासकीय शिस्तीसाठी ओळखले जाणारे धडकनिशी अधिकारी तुकाराम मुंढे आणि विदर्भाच्या अस्मितेचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यातील या थेट संघर्षामुळे हा केवळ खाण्यापिण्याचा विषय न राहता त्याला तीव्र राजकीय रंग चढला आहे. सोशल मीडियापासून ते थेट विदर्भातील रस्त्यांवर आणि हॉटेल व्यावसायिकांमध्ये या विधानावरून प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. काय आहे हा टोटल घोळ, पाहूयात या व्हिडिओतून… नमस्कार मी मृणाली… हा संपूर्ण वाद अमरावती येथे आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमापासून सुरू झाला. अन्न व औषध प्रशासन विभागाची धुरा सांभाळत असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे नेहमीच नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कडक कारवाई करण्यासाठी ओळखले जातात. अमरावतीच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी लोकांच्या खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि आरोग्यावर होणारे त्याचे दुष्परिणाम या विषयावर भाष्य केले. अति तेलकट, अतितिखट आणि मसालेदार पदार्थांमुळे मानवी शरीराला, विशेषतः हृदयाला कसा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, हे ते समजावून सांगत होते. हे सांगताना त्यांनी नागपूर आणि विदर्भाच्या खाद्यसंस्कृतीचा प्राण मानल्या जाणाऱ्या सावजी मटणाचे उदाहरण दिले. आपल्या रोखठोक शैलीत बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की, जर माझ्यासारख्या माणसाने नागपूरचे ते प्रसिद्ध सावजी जेवण जेवले, तर अति तिखट आणि तेलकट असल्यामुळे मी किमान एक महिना आजारी पडेन आणि मला थेट हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागेल. एवढ्यावरच न थांबता त्यांनी अशा प्रकारच्या ऑईली फूडमुळे हार्ट अटॅक येऊ शकतो, असा इशारा देत नागरिकांना आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलण्याचा आणि जिभेवर ताबा ठेवण्याचा सल्ला दिला. तुकाराम मुंढेंचे हे वक्तव्य सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले आणि त्याचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला. हा व्हिडिओ समोर येताच विदर्भातील नागपूर, अमरावती, यवतमाळसह अनेक जिल्ह्यांमध्ये यावर अत्यंत तीव्र आणि आक्रमक प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. बाईट-तुकाराम मुंडे विदर्भातील पारंपरिक हलबा कोष्टी समाज आणि सावजी हॉटेल व्यावसायिक या विधानामुळे कमालीचे संतापले. सावजी ही केवळ एक डिश किंवा केवळ मटणाचा प्रकार नसून, ती विदर्भाची अनेक पिढ्यांची संस्कृती, परंपरा आणि अस्मिता आहे, अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. हलबा समाज युवा संघटनेने मुंढेंच्या या विधानाचा जाहीर निषेध केला आणि त्यांच्या विरोधात निदर्शने सुरू केली. अनेक हॉटेल मालकांनी मुंढेंना लक्ष्य करत म्हटले की, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आणि चमकोगिरीसाठी अशा प्रकारे एका मोठ्या पारंपरिक उद्योगाला बदनाम करणे अत्यंत चुकीचे आहे. नागपूरच्या काही हॉटेल व्यावसायिकांनी तर थेट तुकाराम मुंढेंना कायदेशीर नोटीस बजावली असून, त्यांना जाहीर माफी मागण्याचे खुले आव्हान दिले आहे, अन्यथा न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला आहे.

Read More

सावजीचं मटणराजकीय कुटाणामुंडे बोललेबावनकुळेंना झोंबले

विदर्भाची पारंपरिक खाद्यसंस्कृती असलेल्या प्रसिद्ध सावजी मटणावरून सध्या संपूर्ण महाराष्ट्रात एक मोठा वाद पेटला आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभाग अर्थात एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सावजी जेवणाबाबत केलेल्या एका विधानामुळे या वादाला फोडणी मिळाली असून, त्यावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट आणि आक्रमक शब्दांत पलटवार केला आहे. प्रशासकीय शिस्तीसाठी ओळखले जाणारे धडकनिशी अधिकारी तुकाराम मुंढे आणि विदर्भाच्या अस्मितेचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यातील या थेट संघर्षामुळे हा केवळ खाण्यापिण्याचा विषय न राहता त्याला तीव्र राजकीय रंग चढला आहे. सोशल मीडियापासून ते थेट विदर्भातील रस्त्यांवर आणि हॉटेल व्यावसायिकांमध्ये या विधानावरून प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. काय आहे हा टोटल घोळ, पाहूयात या व्हिडिओतून… नमस्कार मी मृणाली… हा संपूर्ण वाद अमरावती येथे आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमापासून सुरू झाला. अन्न व औषध प्रशासन विभागाची धुरा सांभाळत असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे नेहमीच नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कडक कारवाई करण्यासाठी ओळखले जातात. अमरावतीच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी लोकांच्या खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि आरोग्यावर होणारे त्याचे दुष्परिणाम या विषयावर भाष्य केले. अति तेलकट, अतितिखट आणि मसालेदार पदार्थांमुळे मानवी शरीराला, विशेषतः हृदयाला कसा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, हे ते समजावून सांगत होते. हे सांगताना त्यांनी नागपूर आणि विदर्भाच्या खाद्यसंस्कृतीचा प्राण मानल्या जाणाऱ्या सावजी मटणाचे उदाहरण दिले. आपल्या रोखठोक शैलीत बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की, जर माझ्यासारख्या माणसाने नागपूरचे ते प्रसिद्ध सावजी जेवण जेवले, तर अति तिखट आणि तेलकट असल्यामुळे मी किमान एक महिना आजारी पडेन आणि मला थेट हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागेल. एवढ्यावरच न थांबता त्यांनी अशा प्रकारच्या ऑईली फूडमुळे हार्ट अटॅक येऊ शकतो, असा इशारा देत नागरिकांना आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलण्याचा आणि जिभेवर ताबा ठेवण्याचा सल्ला दिला. तुकाराम मुंढेंचे हे वक्तव्य सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले आणि त्याचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला. हा व्हिडिओ समोर येताच विदर्भातील नागपूर, अमरावती, यवतमाळसह अनेक जिल्ह्यांमध्ये यावर अत्यंत तीव्र आणि आक्रमक प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. बाईट-तुकाराम मुंडे विदर्भातील पारंपरिक हलबा कोष्टी समाज आणि सावजी हॉटेल व्यावसायिक या विधानामुळे कमालीचे संतापले. सावजी ही केवळ एक डिश किंवा केवळ मटणाचा प्रकार नसून, ती विदर्भाची अनेक पिढ्यांची संस्कृती, परंपरा आणि अस्मिता आहे, अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. हलबा समाज युवा संघटनेने मुंढेंच्या या विधानाचा जाहीर निषेध केला आणि त्यांच्या विरोधात निदर्शने सुरू केली. अनेक हॉटेल मालकांनी मुंढेंना लक्ष्य करत म्हटले की, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आणि चमकोगिरीसाठी अशा प्रकारे एका मोठ्या पारंपरिक उद्योगाला बदनाम करणे अत्यंत चुकीचे आहे. नागपूरच्या काही हॉटेल व्यावसायिकांनी तर थेट तुकाराम मुंढेंना कायदेशीर नोटीस बजावली असून, त्यांना जाहीर माफी मागण्याचे खुले आव्हान दिले आहे, अन्यथा न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला आहे. हा वाद जेव्हा लोकभावनेशी आणि प्रादेशिक अस्मितेशी जोडला गेला, तेव्हा यात राजकारण्यांनी उडी घेतली. विदर्भातील चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणात थेट एन्ट्री घेत तुकाराम मुंढेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. मुंबईत पत्रकारांशी बोलताना बावनकुळे यांनी अत्यंत कडक शब्दांत मुंढेंना तंबीच दिली. बावनकुळे म्हणाले की, सावजी हा विदर्भाचा ब्रँड असून ती आमची शान आहे. विदर्भामध्ये गेली तीन ते चार पिढ्यांपासून हजारो कुटुंबे अत्यंत प्रामाणिकपणे सावजी रेस्टॉरंट्स चालवत आहेत आणि हा केवळ एक हॉटेली व्यवसाय नसून घराघरात बनवला जाणारा एक मोठा गृहउद्योग आहे. या व्यवसायावर हजारो लोकांचे पोट अवलंबून असून तो त्यांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांच्या अशा सरसकट वक्तव्यांवर तीव्र आक्षेप नोंदवला. ते म्हणाले की, कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याने संपूर्ण उद्योगाला बळीचा बकरा बनवू नये. रेस्टॉरंट्स बंद पडतील किंवा या व्यवसायाला कायमचा फटका बसेल अशी नकारात्मक विधाने करणे अधिकाऱ्यांना शोभत नाही. बावनकुळे यांनी अधिक स्पष्टपणे भूमिका मांडताना सांगितले की, जर एखाद्या विशिष्ट हॉटेलमध्ये अन्नात भेसळ आढळली, अस्वच्छता असेल किंवा आरोग्याला धोका निर्माण करणारी गोष्ट असेल, तर कायद्यानुसार तिथे खुशाल कडक कारवाई करा, त्याला कोणाचाही विरोध असणार नाही. परंतु, एका जागेवरील कारवाई किंवा वैयक्तिक मताचा आधार घेऊन संपूर्ण सावजी पाककलेला आणि विदर्भाच्या परंपरेला बदनाम करण्याचा अधिकार कोणालाही नाही. आज केवळ देशातच नव्हे, तर जगभरातील अनेक देशांमध्ये सावजी मसाल्याची आणि चवीची मोठी मागणी असताना असे बेजबाबदार विधान करणे अत्यंत दुर्दैवी आहे.