LS खानदेश

आपला आवाज, आपलं खानदेश
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जिल्हा बँकेवरून रक्षा खडसे विरुद्ध चंद्रकांत पाटील! ‘आधी आत्मचिंतन करा’ म्हणत आरोप-प्रत्यारोप
राजकारण

जिल्हा बँकेवरून रक्षा खडसे विरुद्ध चंद्रकांत पाटील! ‘आधी आत्मचिंतन करा’ म्हणत आरोप-प्रत्यारोप

Raksha Khadse Chandrakant Patil
6

जितेंद्र कोतवाल | जळगाव प्रतिनिधी 

Raksha Khadse Chandrakant Patil : जळगावच्या राजकारणात जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची धार तीव्र झाली आहे. जिल्हा बँक, घराणेशाही, विकासकामं आणि राजकीय संस्कारांवरून दोन्ही नेत्यांनी एकमेकांना प्रत्युत्तर दिलं आहे.

रक्षा खडसेंनी चंद्रकांत पाटलांना काय उत्तर दिलं? ( Raksha Khadse Chandrakant Patil )

रक्षा खडसे ( Raksha Khadse ) यांनी चंद्रकांत पाटील यांना निवडणुकीची चिंता न करता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची चिंता करण्याचा सल्ला दिला. जिल्हा बँक ‘खडसेमुक्त’ करायची की नाही, हे मतदार आणि सभासद ठरवतील, असं त्यांनी स्पष्ट केलं. पक्षाने संधी दिली तर आपण निवडणूक लढवू, असंही रक्षा खडसे यांनी सांगितलं. चंद्रकांत पाटील यांच्या राजकारणाची सुरुवातच खडसे कुटुंबाला विरोध करून झाल्याचा पलटवार करत, त्यांनी आधी आत्मचिंतन करावं, असा टोला रक्षा खडसेंनी लगावला. मुक्ताईनगरमधील परिस्थिती आणि नगराध्यक्षपदावरूनही त्यांनी टीका केली.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनीही रक्षा खडसेंच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. सत्ता भोगणाऱ्या परिवाराच्या विरोधात आपण निवडून आलो असल्याचा दावा त्यांनी केला. 2017 पासून किती बैठका घेतल्या आणि किती घरकुलं मंजूर केली, याचं आधी आत्मचिंतन करावं, असं पाटील म्हणाले.

हेही वाचा : वांग्याच्या पिकावर कुणी घातलं विष? फवारणीनंतर संपूर्ण पीक जळालं; शेतकऱ्याचं मोठं नुकसान

जिल्हा बँकेतील ठरावांवर चंद्रकांत पाटलांचा आक्षेप

जिल्हा बँकेतील ठराव बेकायदेशीर असल्याचा आरोप करत दबाव टाकून निर्णय घेतले जात नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. हा केवळ एका पक्षाचा नव्हे, तर महायुतीचा प्रश्न असल्याचं सांगत, महायुतीच्या माध्यमातून किती कामं केली, याचा हिशोब वरिष्ठांकडे मांडणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रक्षा खडसे विरुद्ध चंद्रकांत पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र झाल्याचं चित्र आहे.

img

Harshad Kamble

Website Developer | SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics. Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur. I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. 🏆Awarded By :🥇 The Best Digital Marketer And Technologist Award.🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post